सोमवार, 30 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 19 फेब्रुवारी 2019 (18:40 IST)

दारुड्या पतीचा पत्नीने डोक्यात दगड घालून केला खून

पुण्यातल्या हिंजवडी पोलीस ठाणे हद्दीतील पांढरे वस्ती पुनावळे येथे दारु पिऊन त्रास देणाऱ्या पतीचा पत्नीने डोक्यात दगड घालून खून केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गजानन जमुनाप्रसाद निषाद (२८) असे खून झालेल्याचे नाव आहे. पोलिसांनी पत्नी रानौ गजानन निषाद (२४) हिस अटक केली आहे.
 
गजानन आणि रानौ हे दोघे पती-पत्नी पुनवळेत राहत होते.  ते कामासाठी पुण्यात आले होते.  सध्या पुनावळे येथील कैलास हिंदुजा यांच्या जागेत असलेल्या लेबर कॅम्पमध्ये ते राहत होते. त्यांना दिड वषार्ची मुलगी आहे. गजानन याला दारुचे व्यसन होते. तो वारंवार दारु पिऊन पत्नी रानौला मारहाण करुन त्रास द्यायाचा. सोमवारी  त्या दोघांमध्ये भांडण झाले. या कारणावरुन रानौ हीने गजाननच्या डोक्यात  दगड मारुन त्याचा खून केला. याबाबत हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.