शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 7 जुलै 2023 (17:42 IST)

Nagpur : पाणी पुरी खाऊन नर्सिंगच्या विद्यार्थिनीचा मृत्यू

पाणी पुरी ज्याचे नाव घेतल्यावर तोंडाला पाणी येतं. पाणी पुरी प्रत्येकाला आवडणारे खाद्य आहे. उघड्यावर खाणे टाळावे असे म्हटले जाते. एखाद्या स्वच्छ ठिकाणातून पाणीपुरी किंवा खाद्य पदार्थ खालले तर त्याचा त्रास होत नाही. घाणेरड्या ठिकाणाहून खाललेले खाद्य पदार्थ जीव धोक्यात टाकू शकतात. नागपुरात नर्सिंगच्या एका विद्यार्थिनीला पाणीपुरी खाणे महागात पडले असून तिचा दुर्देवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे.मयत विद्यार्थिनी जम्मू-काश्मीरची राहणारी असून शीतल कुमारी असे तिचे नाव आहे. पाणीपुरी खाल्ल्यावर तिची तब्बेत बिघडली नंतर तिला उलट्या आणि अतिसाराचा त्रास होऊ लागला.तिला गंभीर अवस्थेत रुग्णालयात नेण्यात आले मात्र तिचा मृत्यू झाला. 
 
मिळालेल्या माहितीनुसार, नागपुरात मेडिकल कॉलेजच्या बीएससी नर्सिंग विद्यार्थीनी शीतल आणि तिच्या दोघी मैत्रिणींनी पाणीपुरी खालली  मात्र काहीच तासानंतर तिच्या पोटात दुखू लागले आणि तिला उलट्या आणि अतिसारचा त्रास होऊ लागला. तिला डॉक्टरांनी रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला दिला. मात्र तिने नकार दिला. नंतर तिची प्रकृती खालावली. तिला रुग्णालयात दाखल केले असता. तिचा मृत्यू झाला. तिच्या सोबत इतर मुलींनी देखील पाणी पुरी खालली होती. तिला देखील त्रास होऊ लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.  तिघींनाही गॅस्ट्रोची लागण झाली असावी असा अंदाज लावला जात आहे. 

पाणीपुरीतून विषबाधा झाली का असा प्रश्न उद्भवत आहे. तिच्या मृत्यूचे कारण शवविच्छेदन केल्यावर कळेल. 
तिच्या मृत्यूची बातमी तिच्या पालकांना देण्यात आली असून ते नागपुरात आले असून मुलीचा मृतदेह पाहून त्यांना अश्रू अनावर झाले. मयत विद्यार्थिनीचा मृतदेह जम्मू ला नेण्याची इच्छा त्यांनी दाखवली असून त्यांना मेडिकल प्रशासनाकडून मदत पुरविली जात आहे. 
 
Edited by - Priya Dixit