शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 20 डिसेंबर 2023 (08:25 IST)

नांदेड-लातूर केंद्रातून ‘नेकी’प्रथम, लातूरच्या ‘मुक्ती’ नाटकास तृतीय पारितोषिक

Natak
62 व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत नांदेड-लातूर केंद्रातून सिद्ध नागार्जुन  मेडिकल असोसिएशन, नांदेड या संस्थेच्या ‘नेकी’ या नाटकाला प्रथम पारितोषीक तसेच आंबेडकरवादी मंच नांदेड या संस्थेच्या ‘गटार’या नाटकास द्वितीय तर लातूरच्या सुर्योदय बहुउद्देशिय सेवाभावी संस्थेच्या ‘मुक्ती’ या नाटकास तृतीय पारितोषीक जाहीर झाल्याची घोषणा सांस्कृतिक कार्य संचालक बिभीषण चवरे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे. ‘नेकी’ आणि ‘गटार’ या दोन्ही नाटकांची अंतिम फेरीसाठी निवड झाली आहे.
 
दिग्दर्शक प्रथम पारितोषीक रागेश्री जोशी (नाटक-नेकी), द्वितीय पारितोषी राहूल जोंधळे(नाटक-गटार), प्रकाश योजना प्रथम माणिकचंद थोरात(नाटक-गटार), द्वितीय जितेंद्र बनसोडे (नाटक-पुरुष गाळणा-या बायकांचा गाव), नेपथ्य प्रथम गौतम गायकवाड (नाटक-नेकी), द्वितीय अनिल साळवे (नाटक-द अनॉनिमस), रंगभूषा प्रथम सचिन उपाध्ये (नाटक-मुक्ती), द्वितीय रुपेश सूर्यवंशी (नाटक-विठो रखुमाय), उत्कृष्ट अभिनय रौप्यपदक किशोर पुराणीक(नाटक-गंमत असते नात्याची) व माधुरी लोकरे (नाटक-नेकी), अभिनयासाठी गुणवत्ता प्रमाणपत्रे डॉ. अर्चना चिक्षे (नाटक- गंमत असते नात्याची), ऐश्वर्या डावरे (नाटक- चिरंजीवी), डॉ. स्वप्नजा यादव (नाटक-मुक्ती), प्रतिक्षा पाटवकर (नाटक-विठो रखुमाय), अर्पणा गोवंडे(नाटक-बॅरिस्टर), विजय गजभारे(नाटक-गटार), अतुल साळवे(नाटक-द अनॉनिमस), दस्गीर शेख (नाटक-संगीत दहन आख्यान), डॉ. मुकूंद भिसें(नाटक-द कॉन्शंस), डॉ. सत्यविजय जाधव (नाटक-बॅरिस्टर). दि. 21 नोव्हेंबर ते 16 डिसेंबर या कालावधीत कुसूम नाट्यगृह, नांदेड व स्व. दगडोजराव देशमुख सभागृह लातूर येथे अतिशय जल्लोषात झालेल्या या स्पर्धेत एकुण 23 नाट्यप्रयोग सादर करण्यात आले.
 
स्पर्धेसाठी परिक्षक म्हणून प्रताप सोनाळे, संजय द. पाटील, शंकर शंखपाळे यांनी काम पाहिले. सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे यांनी विजेत्यांचे अभिनंदन केलेले आहे. सांस्कृतिक कार्य मंंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी प्रथम, द्वितीय आलेल्या नाटकांच्या संघाचे तसेच इतर पारितोषीक प्राप्त कलाकारांचे अभिनंदन केले असून भविष्यातही या संघांनी व कलाकारांनी सर्वोत्तम कामगिरी करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

Edited by -Ratnadeep Ranshoor