शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : शनिवार, 19 फेब्रुवारी 2022 (13:03 IST)

नारायण राणे यांचा शिवसेना खासदारांवर घणाघाती हल्ला

राज्यात काही दिवसांपासून एकमेकांचे घोटाळे उघडे करण्यावरून वातावरण तापले आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेना खासदारांवर घणाघात हल्ला केला आहे. त्यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी पुन्हा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांचावर घणाघाती हल्ला बोल केला. 
 
ते म्हणाले- विकासाच्या बाबतीत खासदार राऊत काहीच बोलत नाही. आम्ही अजून कोणाचेही घोटाळे बाहेर काढले नाही आम्हाला राजकारण कोणी शिकवू नये. आमच्या घराला बीएमसी कडून नोटीस बजावण्यात आली आहे. माझ्या घराच्या इमारतीचे बांधकाम नामवंत आर्किटेक्ट ने केले आहे. महानगरपालिकेने परवानगी दिल्यावर या बांधकामावर एक इंच ही बांधकाम केले नाही. ही कायदेशीर इमारत असून 100 टक्के निवासी इमारत आहे.

राज्यात शेतकरी अस्वस्थ आहे. बाळासाहेबांनी मराठी मांसासाठी शिवसेनेचे निर्माण केले पण आज शिवसेनेचे खासदार मराठी माणसाच्या मुळावर उठले आहे. आम्ही कुणाच्या पोटावर मारून राजकारण करत नाही. त्यांनी सुशांत सिंग राजपूत आणि दिशा सालियनच्या प्रकरणात म्हटले की, त्यांच्या मृत्यूच्या वेळी सीसीटीव्ही कॅमेरे कसे काय गायब झाले? त्यांच्या शव विच्छेदनाचा अहवाल का आला नाही? त्यांनी आत्महत्या केली नसून त्यांची हत्या केली आहे. असे ट्विट त्यांनी काल केले होते. आणि सुशांतसिंग हे दिशा सालियनच्या हत्ये बाबत माहिती देणार होते म्हणून त्यांची देखील हत्या करण्याचा आरोप नारायण राणे यांनी केला आहे.