1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 19 जून 2023 (08:55 IST)

नाशिक: ‘अंगठा द्यायचाय, शाईपॅड आणा,’ असं सांगितलं, अन् भामट्याने बँक ऑफ बडोदा बँकेतून दोन लाखांची रोकड पळवली!

बँकेचा कर्मचारी असल्याचे भासवून नाशिकच्या बँक ऑफ बडोदा शाखेतून दोन लाख रुपये हातोहात पळविल्याची घटना घडली आहे.
नाशिक शहरातील जेलरोड भागातील बँक ऑफ बडोद्याच्या शाखेत एका भामट्याने आई आणि मुलाची फसवणूक करुन दोन लाखांची रोकड घेऊन पोबारा केल्याचा प्रकार घडला आहे.
 
बोलण्यात गुंतवत तसेच बँकेचा कर्मचारी असल्याचे भासवून बँक ऑफ बडोदा शाखेतून दोन लाख रुपये हातोहात पळवल्याची घटना घडली आहे.
नाशिकच्या जेलरोड परिसरात राहणारे अंकुर लाटे हे त्यांची आई लिलाबाई सोमनाथ लाटे यांच्यासोबत गुरुवारी (15 जून) सकाळी अकरा वाजेच्या सुमारास बँकेत गेले होते. नाशिक पुणे महामार्गावरील जुना आशीर्वाद बस थांब्याजवळील बँक ऑफ बडोदा शाखेत दोन लाखांची रक्कम भरण्यासाठी गेले होते.
 
अंकुरने दोन लाखांची रोकड बँकेच्या कॅशियरसमोर काउंटरवर ठेवली. त्याचवेळी बँकेचा कर्मचारी असल्याचे भासवत आलेल्या एका इसमाने अंकुरला थम्बपॅड आणण्यास सांगताच अंकुर बाजूला गेला आणि हिच संधी साधत अज्ञात व्यक्तीने कॅशियरसमोर ठेवलेली रोख रक्कम लंपास करत बँकेतून पळ काढला.
 
दरम्यान काही मिनिटात अंकुश परत येताच बँकेच्या कॅशियरने पैसे मोजण्यासाठी घेतले असावे, असा त्याचा समज झाला, मात्र कॅशियरने रक्कम घेतली नसल्याचे सांगितले यावरुन बँकेत एकच खळबळ उडाली. आई आणि मुलाने बँकेच्या अधिकारी तसंच कर्मचाऱ्यांकडे विचारणा केल्यानंतर असा कोणताही कर्मचारी बँकेत कार्यरत नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे लाटे मायलेकांना त्यांची फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने त्यांनी उपनगर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी बँकेचे सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले असता चोरीची ही संपूर्ण घटना उघडकीस आली. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत.
 
पोलिसांत गुन्हा दाखल:
जेलरोड, शिवरामनगर येथे राहणाऱ्या वयोवृद्ध लिलाबाई सोमनाथ लाटे व त्यांचा मुलगा अंकुर हे गुरुवारी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास बँक ऑफ बडोदाच्या शाखेत पैसे भरण्यासाठी गेले होते. यावेळी एका अनोळखी व्यक्तीने दोघांना बँक कर्मचारी असल्याची बतावणी करुन एटीएममध्ये पैसे भरण्यास जात असल्याचे सांगत त्यांच्याजवळील रोकड भरणा करण्याची स्लिप आणि दोन लाखांची रोकड घेतली. दोन लाखांची रक्कम व पावती कॅश काऊंटरकडे ठेवली. पावती घेऊन आजीचा अंगठा बाकी आहे, असे सांगून मुलाला शाईचे पॅड आणायला लावले. अंकुर पॅड आणायला गेला असताना भामट्याने दोन लाखांची रोकड घेऊन पोबारा केला. मुलगा अंकुर शाई पॅड घेऊन आईकडे आला, तेव्हा त्याला बँकेचा कर्मचारी असल्याची बतावणी करणारा व्यक्ती बँकेत दिसून आला नाही.

Edited By - Ratnadeep ranshoor