1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 5 ऑगस्ट 2023 (20:53 IST)

नाशिक : पोलिस भरतीसाठी पळण्याचा सराव करताना तरुणाचा मृत्यू

death
नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील मुसळगाव येथे पोलिस भरतीसाठी पळण्याचा सराव करीत असतानाच एका तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना शुक्रवारी घडली. भारत पोपट जाधव (वय २८) असे मृत तरुणाचे नाव आहे. या घटनेमुळे मुसळगाव येथील नागरिकांवर व जाधव कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
 
भारत पोलिस भरतीसाठी रोज सराव करत असे. पोलिस होण्याचे त्याचे स्वप्न होते. नेहमीप्रमाणे भारत हा मित्रांसोबत धावण्याचा सराव करत होता. यावेळी अचानक तो खाली कोसळला. त्यास मित्रांनी तत्काळ सिन्नर येथे खासगी रुग्णालयात दाखल केले. खासगी रुग्णालयातून त्याला शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले. येथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्याला मृत घोषित केले.
 
Edited By - Ratnadeep Ranshoor