बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 28 फेब्रुवारी 2019 (09:42 IST)

स्कॉड्रन लिडर निनाद अनिल मांडवगणे जम्मू-काश्‍मीरमद्ये शहीद

जम्मू-काश्‍मीरमधील बडगाममध्ये भारतीय हवाई दलाचे हेलिकॉप्टर कोसळले आहे. तांत्रिक बिघाडामुळे हे विमान कोसळल्याची माहिती देण्यात आली आहे. जम्मू काश्मीरमधील बडगाम येथे बुधवारी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास MI 17 V5 या हेलिकॉप्टरमध्ये एकूण सहा जण प्रवास करीत होते. याच विमानाचे सारथ्य निनाद हे करीत होते. मात्र, सकाळी १० वाजून १० मिनिटांनी हे हेलिकॉप्टर बडगाम जवळ कोसळले. या अपघातात निनाद तसेच अन्य तीन अधिकारी व एका स्थानिक नागरिकाचा मृत्यू झाला आहे. तशी माहिती हवाई दलाच्या अधिकाऱ्यांनी निनाद यांच्या कुटुंबियांना फोनद्वारे दिली आहे.निनाद यांचे पार्थिव हवाई दलाच्या विमानाने शुक्रवारी (१ मार्च) नाशिकमध्ये आणले जाईल अशी शक्यता आहे.या मध्ये नाशिकचे सुपुत्र स्कॉड्रन लिडर निनाद अनिल मांडवगणे (वय 33) हे शहीद झाले असून,त्यांच्या मागे पत्नी, दोन वर्षाची कन्या, वडील, आई, धाकटा बंधू असा परिवार आहे. 
 
नाशिक येथील डीजीपीनगर येथील श्री साईस्वप्न को-ऑपरेटिव्ह हॉसिंग सोसायटीमधील बॅंक ऑफ इंडिया कॉलनीतील बारा क्रमांकाच्या बंगल्यात मांडवगणे कुटुंबिय रहिवासी आहेत. शाहिद निनाद यांचा जन्म 1986 मध्ये झाला आहे. ते भोसला मिलीटरी स्कूलचे विद्यार्थी होते. अकरावी, बारावीचे शिक्षण त्यांनी औरंगाबादच्या सैनिकी पूर्व संस्थेतून पूर्ण केले असून, ते 26 व्या अभ्यासक्रमाचे माजी विद्यार्थी आहेत. बी. ई. मॅकेनिकल ही पदवी घेतली असून त्यांची निवड राष्ट्रीय सुरक्षा प्रबोधिनीमध्ये झाली होती तर हैदराबादमध्ये प्रशिक्षण पूर्ण केल्यावर 24 डिसेंबर 2009 मध्ये भारतीय हवाई दलाच्या सेवेत दाखल झाले होते तर 24 डिसेंबर 2015 मध्ये त्यांची निवड स्कॉड्रन लिडरपदी झाली होती. गुवाहाटी, गोरखपूरमधील सेवा झाल्यावर आता त्यांची श्रीनगरमध्ये नेमणूक झाली होती.