रविवार, 5 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 11 जुलै 2022 (14:56 IST)

नाशकात दमदार पावसाने धरणसाठ्यात लक्षणीय वाढ; गोदाकाठी सतर्कतेचा इशारा

river
गंगापूर प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या दोन दिवसांपासून अतिवृष्टी होत आहे. त्यामुळे गंगापूर प्रकल्पाच्या मुक्त पाणलोट क्षेत्रामधून गोदावरी नदीमधे होळकर पुलाजवळ 7 हजार क्युसेक्स इतका विसर्ग सुरु आहे. पावसाचा जोर पुढचे काही दिवस असाच राहणार असल्याचा अंदाज आहे. त्यामुळे गंगापूर धरणामधून आज दुपारी 11 वाजता सुरुवातीला 1500 क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग केला जाणार आहे. त्यानंतर तो टप्याटप्याने वाढविण्यात येणार आहे. परिणामी, रामकुंड परिसरातील होळकर पुलाजवळ गोदावरी नदीत पाण्याची पातळी वाढणार आहे. नाशिक शहरातील गोदावरी नदीकाठच्या नागरीकांनी सतर्क रहावे, अशा सूचना प्रशासनामार्फत देण्यात येत आहे.
 
यंदा पावसाळा सुरू झाल्यापासून प्रथमच गोपदावरीला पूर आला आहे. त्यामुळे शहरालगत असलेला सोमेश्वर धबधबाही प्रवाहीत झाला आहे. परिणामी तो पाहण्यासाठी आणि रामकुंड परिसरातील पूर पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. मात्र, नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, खासकरुन सेल्फी काढणाऱ्यांनी काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
 
नाशिक शहरात गेल्या तीन दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. गेल्या 24 तासामध्ये नाशिक शहर परिसरात 77 मिलिमटर पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळेच गेल्या तीन दिवसांपूर्वी 28 टक्क्यांवर आलेला गंगपूर धरणाचा साठा आता थेट 55 टक्क्यांवर गेला आहे. परिणामी, नाशिककरांवर असलेले पाणी कपातीचे संकटही जोरदार पावसाने दूर केले आहे. तसेच, येते काही दिवस पावसाचा मुक्काम कायम राहणार असल्याने नाशिककरांना पिण्याच्या पाण्याचा मोठा दिलासा मिळाला आहे. शिवाय शेतकऱ्यांना ही शेतीसाठी पाणी उपलब्ध झाले आहे. त्यामुळे आता जिल्ह्यातील पेरणीलाही वेग आला आहे.
 
आज दि .11 जुलै 2022,आज रोजी 12:00 वा गंगापूर धरणातून 3000 क्युसेक्स विसर्ग गोदावरी नदीपात्रात सोडण्यात येणार आहे. तर दुपारी 1:00 वा. गंगापूर धरणातून 5500 क्युसेक्स विसर्ग गोदावरी नदीपात्रात सोडण्यात येणार आहे.कडवा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसाने धरणाच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. पावसाचा जोर टिकून असल्याने आज दुपारी 1:00 वा कडवा धरणातून 4150 क्युसेक्स विसर्ग कडवा नदीपात्रात सोडण्यात येईल. तसेच आवश्यकतेनुसार टप्प्याटप्प्याने विसर्ग वाढवण्यात येईल, असे प्रशासनाने सांगितले आहे.
 
दिंडोरी तालुक्यात सलग चार दिवसापासून जोरदार स्वरूपाचा पाऊस पडत असल्यामुळे नदी नाले तुडुंब भरून वाहत आहे सर्वत्र पाणीच पाणी पाहण्यास मिळत आहे. भिज पाऊस पडत असल्यामुळे जमिनीची संपूर्ण शांतता होऊन पाण्याचा थेंब थेंब वाहत असल्यामुळे सर्वत्र पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे.तालुक्यातील नदी नाल्यांना मोठ्याप्रमाणात पूर येत असल्यामुळे तालुक्यातील धरण साठ्यामध्ये झपाट्याने वाढ होताना दिसत आहे आज सकाळी 9 वाजता पालखेड धरणातून 20770 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग कादवा नदीत सोडण्यात आला असून मांजरपाडा( देवसाने) प्रकल्प परिसरामध्ये मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे पुणेगाव 69.82% भरले असून पुणेगाव धरणातून आज सकाळी 7 वाजता 4000 क्युसेक्स पाणी उनंदा नदी पात्रात सोडण्यात आले असून त्यांमुळे ओझरखेंड धरणाचा पाणीसाठा 38.5 % इतका वाढला आहे दिंडोरी तालुक्याच्या पश्चिम भागामध्ये अतिमुसळधार पाऊस पडत असल्यामुळे करंजवण धरण 44.22% इतके भरले आहे तर वाघाड धरणाची पाणीपातळी झपाट्याने वाढत असल्यामुळे वाघाड धरण 54. 47७% इतके भारले आहे असून तिसगाव धरणामध्ये पूरपाणी येण्यास सुरुवात झाली आहे.दिंडोरी तालुक्यात नॉनस्टॉप जोरदार पाऊस पडत असल्यामुळे पुढील काही तासामध्ये मोठ्या प्रमाणावर पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे दिंडोरी तालुक्यात आज पडलेले पाऊस पुढील प्रमाणे दिंडोरी 71.00 mmपालखेड धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसाने धरण द्वारपरिचलन पातळी (ROS)पूर्ण झाल्याने व पाण्याची आवक वेगाने वाढल्यामुळे सकाळी 9:०० वा पालखेड धरणातून विसर्ग वाढवून 20770 क्युसेक्स विसर्ग कादवा नदीपात्रात सोडण्यात आला आहे.