शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 29 ऑक्टोबर 2021 (08:11 IST)

आर्यन खानच्या जामिनावर नवाब मलिक यांची प्रतिक्रिया; म्हणाले -‘पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त…

एनसीबीचे  संचालक समीर वानखेडे यांच्याविरोधात आघाडी उघडणारे राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या  निर्णयावर सूचक प्रतिक्रिया दिली आहे. वानखेडे यांच्या विरोधात लढाई सुरुच राहणार असल्याचे संकेत नवाब मलिक यांनी ट्विटच्या माध्यमातून दिले आहेत. ‘पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त…’ असं सूचक ट्विट नवाब मलिक यांनी आर्यन खानच्या जामिनाचा निर्णय आल्यानंतर केलं आहे.

त्याशिवाय, व्हिडीओच्या माध्यमातूनही त्यांनी प्रतिक्रीया  दिली असून समीर वानखेडे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे.
 
नवाब मलिक म्हणाले, ज्या समीर वानखेडे यांनी क्रूझ प्रकरणात या मुलांना तुरुंगात टाकलं, तेच आता घाबरले आहेत. या प्रकरणाची चौकशी सध्या महाराष्ट्र पोलीस करत आहेत. ती सीबीआयकडे (CBI) किंवा एनआयएकडं  द्यावी, अशी मागणी त्यांनी कोर्टात केली होती.हायकोर्टानं त्यांना अटकेपासून संरक्षण देऊन ही याचिका निकाली काढली. अटक करण्याआधी त्यांना 72 तासांची नोटीस दिली जाईल, असं मुंबई पोलिसांनी कोर्टात स्पष्ट केलंय.