मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 10 जानेवारी 2019 (09:27 IST)

राष्ट्रवादीची निर्धार परिवर्तन यात्रा

राष्ट्रवादी काँग्रेसची निर्धार परिवर्तनाचा ही यात्रा गुरुवारी रायगडमधून सुरू होत आहे. किल्ले रायगडवर छत्रपती शिवाजी महाराज आणि चवदार तळ्यावर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून या यात्रेला प्रारंभ होत आहे. यानिमित्ताने महाडच्या भिलारे मैदानावर जाहीर सभा आयोजित केली आहे.राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे, प्रफुल्ल पटेल, अजित पवार यांच्यासह राज्यातील पक्षाचे प्रमुख नेते यावेळी उपस्थित राहणार आहेत. या सभेला 20 हजार कार्यकर्ते हजेरी लावतील असा अंदाज आहे. यानिमित्ताने कोकणात राष्ट्रवादी काँग्रेस जोरदार शक्तीप्रदर्शन करणार आहे. कोकणात राष्ट्रवादीची ताकद फारशी नाही. त्यातच आगामी लोकसभेची निवडणूक लक्षात घेता कोकणातील रायगड लोकसभेची जागा आघाडीच्यावतीने आपल्याला मिळावी, असा आग्रह राष्ट्रवादीने धरला आहे. या पार्शवभूमीवर त्यांचे हे महाडमधील शक्तीप्रदर्शन महत्वाचे ठरणार आहे.