शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 9 एप्रिल 2022 (21:11 IST)

उष्णतेच्या लाटेची दखल घेत शिक्षण आयुक्तांनी काढले नवे आदेश

राज्यात उष्णतेची तीव्र लाट सुरू आहे. अनेक भागात तापमान ४४ अंशांपर्यंत पोहचले आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून यासंदर्भात इशारा देण्यात आला आहे. पुढील काही दिवस उन्हाची तीव्रता अधिक राहणार आहे. आता याची दखल राज्याचे शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी घेतली आहे. त्यामुळे त्यांनी नवे आदेश काढले आहेत. त्यात आयुक्तांनी म्हटले आहे की, काही जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा सामना करावा लागत आहे. हे स्पष्ट करण्यात येत आहे की, भारतीय हवामानशास्त्र विभागाद्वारे जारी केलेल्या उष्णतेच्या लाटेच्या चेतावणीच्या प्रसंगी, संबंधित शिक्षणाधिकारी यांनी जिल्हाधिकारी किंवा सीईओ यांच्याशी चर्चा करून जिल्हा स्तरावर निर्णय घ्यावा. त्यानुसार, सध्या पूर्णवेळ सुरू असलेल्या शाळांना काही वेळ दिलासा मिळण्याची शक्यता आहे. तसेच, ज्या भागात उन्हाची तीव्रता आहे त्या भागात शाळांच्या वेळेत बदल करणे शक्य होणार आहे.