शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 14 नोव्हेंबर 2022 (21:40 IST)

राजकीय सूड भावनेपोटी कोणतीही कारवाई करण्यात आली नाही: मुख्यमंत्री

eaknath shinde
राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर विनयभंगाची तक्रार दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणावरून महाविकास आघाडीच्या नेत्यांनी शिंदे-फडणवीस सरकावर टीकास्त्र सोडलं आहे. यावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
 
“महिलेने गुन्हा दाखल केला आहे. त्यानुसार पोलीस चौकशी करुन तपास आणि पडताळणी करतील. गुन्ह्यात तथ्य असेल, नसेल हे पाहून पोलीस पुढील कारवाई करतील. राजकीय सूड भावनेपोटी कोणतीही कारवाई करण्यात आली नाही,” असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं.
 
Edited By - Ratnadeep Ranshoor