मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 16 जानेवारी 2019 (09:18 IST)

आता शिष्यवृत्ती योजनेसाठी पालकांची वार्षिक उत्पन्न मर्यादा ८ लाख

आर्थिकदृट्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी शालांत परीक्षोत्तर गुणवत्ता शिष्यवृत्ती योजनेसाठी पालकांची वार्षिक उत्पन्न मर्यादा 30 हजार रुपयांवरून 8 लाख रुपये एवढी करण्यात आली आहे. याबाबतचा निर्णय शासनाच्या शालेय शिक्षण विभागाकडून घेण्यात आला आहे.
 
सन 1978-79 पासून ही शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येत आहे. या शिष्यवृत्तीस पात्र होण्यासाठी माध्यमिक शालांत परीक्षेत म्हणजेच इयत्ता दहावीच्या विद्यार्थांची गुणमर्यादा 50 टक्के करण्यात आली आहे. एकूण 3 हजार 200 मुलांना शिष्यवृत्तीचा लाभ दिला जातो. पात्र विद्यार्थ्यांमधून जास्तीत जास्त गुण असणार्‍या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीसाठी निवड केली जाते.