बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 19 डिसेंबर 2018 (08:50 IST)

शालेय शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलली

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने 17 फेब्रुवारी रोजी घेण्यात येणारी पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. ही परीक्षा आता 24 फेब्रुवारीला घेण्यात येणार आहे. 17 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने राज्यसेवा पूर्व परीक्षा घेण्यात येणार असल्याने शालेय शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचे परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांनी स्पष्ट केले.