बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 18 डिसेंबर 2018 (16:22 IST)

मोबाईलचा वापर केला हत्यारासारखा, वडिलांना फेकून मारला मोबाईल

चिंचवडच्या छत्रपती शिवाजी पार्क भागात राहणाऱ्या एका मुलाने त्याच्या वडिलांना मोबाईल फेकून मारला. मोबाईल डोक्याला लागल्याने वडील जखमी झाले आहेत. त्यांनी मोबाईलफेक्या मुलाविरोधात पोलिसांत तक्रार नोंदवली आहे. दिगंबर राळे (52) आणि त्यांचा मुलगा सूरज राळे (25) यांच्या गेल्या अनेक महिन्यांपासून वाद सुरू आहेत. या दोघांमध्ये सातत्याने भांडणं होत असतात. 17 डिसेंबर रोजी  म्हणजेच सोमवारी दोघांमध्ये पुन्हा एकदा भांडण झालं. भांडण सुरू असताना सूरजचा राग अनावर झाला आणि त्याने हाताशी असलेला मोबाईल वडिलांना फेकून मारला. या मोबाईल हल्ल्यात दिगंबर किरकोळ जखमी झाले आहेत. या हल्ल्यानंतर त्यांनी चिखली पोलीस स्टेशन गाठले आणि मुलाविरूद्ध तक्रार नोंदवली.