शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 22 मे 2017 (12:24 IST)

सामनातून समृद्धी महामार्गाला कडाडून विरोध

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाला कडाडून विरोध केला आहे. बुद्धिबळाचे डाव रचून विजय प्राप्त करणाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या गळ्यास नख लावण्याचा प्रयत्न करून पाहावाच! असे आव्हान उद्धव ठाकरे यांनी  सामनाच्या अग्रलेखातून दिले आहे. मनात अखंड महाराष्ट्राचा विचार नाही व महाराष्ट्र तोडण्याचे स्वप्न आहे ते मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गासाठी शेतकऱ्यांचे बळी घेत आहेत. शिवसेना हे कदापि होऊ देणार नाही असे उद्धव यांनी अग्रलेखात म्हटले आहे. फक्त या ‘ड्रीम प्रोजेक्ट’ला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांचा शिरच्छेद करण्याचेच काय ते बाकी आहे. मुख्यमंत्री फडणवीस, तुमच्या चेहऱ्यावर हसरा मुखवटा आहे, पण मागे असलेला खरा चेहरा शेतकऱ्यांचे अश्रू आणि आक्रोश पाहून हसतो आहे काय? असा सवाल उद्धव यांनी विचारला आहे.