सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 23 एप्रिल 2021 (09:27 IST)

महसूलमंत्र्यांच्या तालुक्यात निर्माण झालीये ऑक्सिजन टंचाई

अहमदनगर शहरामध्ये ऑक्सिजन टंचाई सूर आहे त्यापाठोपाठ आता संगमनेरातही ऑक्सिजनची टंचाई निर्माण झाली आहे.
 
संगमनेरातील खासगी डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर्समध्ये पुढील काही तांस पुरेल इतकाच ऑक्सिजनचा साठा शिल्लक असून या रुग्णालयांमध्ये उपचार घेणार्‍या जवळपास साडेतिनशे रुग्णांचा जीव त्यामुळे टांगणीला लागला आहे.
 
अहमदनगर जिल्ह्यात २१ हजारांच्यावर रुग्ण सध्या उपचार घेत आहे. ऑक्सिजन पातळी कमी असणारे खासगी व शासकीय रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या वाढती आहे. त्यामुळे ऑक्सिजनची मागणी वाढली आहे.
 
नगर शहरात टंचाई निर्माण झाल्यानंतर आता संगमनेर तालुक्यात कमतरता भासत आहे. तालुक्यातील रुग्णांना ऑक्सिजन कमी पडत आहे, यामुळे संगमनेर शहर व तालुक्यातील डॉक्टरांकडून चिंता व्यक्त होत आहे.
 
ऑक्सिजन लवकर प्राप्त नाही झाला तर रुग्णांचा जीव धोक्यात येऊ शकतो अशी चिंता व्यक्त होत आहे. रुग्णांच्या नातेवाईकांत चिंता निर्माण झाली आहे.
 
दरम्यान संगमनेरातील रुग्णालयांना लागणार्‍या ऑक्सिजनसाठी महसुलमंत्री बाळासाहेब थोरातही प्रयत्नशील असून उद्यापर्यंत 10 मेट्रिक टन ऑक्सिजन उपलब्ध करण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरु आहेत.