शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

Live Updates : पनवेल महापालिका निवडणूक निकाल

पनवेल, भिवंडी आणि मालेगाव महापालिकेसाठी मतमोजणीला सकाळी 10 वाजता सुरुवात झाली आहे. पनवेलमध्ये एकूण 53 टक्के मतदान झाले असून 418 उमेदवारांच्या भवितव्याचा निकाल लागणार आहे. पनवेल महापालिकेची ही पहिलीच निवडणूक असल्याने महापालिकेवर कोणाचा झेंडा फडकणार याची उत्सुकता सगळ्यांनाच आहे.
 
शेकाप महाआघाडीचा महापौर बसेल की, ठाकूर समर्थक भाजपच्या हाती महापालिका जाते, याचे चित्र दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास स्पष्ट होईल. भिवंडीत पाच केंद्रांवर मतमोजणी होईल. निकालादरम्यान कायदा सुव्यवस्था बिघडू नये, यासाठी विजयी उमेदवारांना मिरवणुका काढण्यावर बंदी घालण्यात आली आहे.

पनवेल महापालिका निवडणूक निकाल: एकूण – 78
– भाजप 50 जागांवर विजयी
– शेकाप 24 जागांवर विजयी
– राष्ट्रवादी 2 जागांवर विजयी
– काँग्रेस 2 जागांवार विजयी
 
पनवेल महापालिका निवडणूक निकाल: भाजपची 51 तर शेकापची 25 जागांवर आघाडी…भाजपला स्पष्ट बहुमत….नव्या महापालिकेचा शुभारंभ भाजपच्या सत्तेने….

पनवेल महापालिका निवडणूक निकाल: खारघर, खांडा कॉलनीमध्ये ईव्हीएम मशीनसोबत छेडछाड करण्यात आल्याचा आरोप शेकापने केलाय…हा निकाल पनवेलसाठी धक्कादायक…
 
पनवेल महापालिका निवडणूक निकाल: शेकापच्या गडात भाजपचा धोबीपछाड, भाजचा 46 जागांवर विजय..
 
पनवेल महापालिका निवडणूक निकाल: भाजपची 51 जागांवर आघाडी तर शेकाप 17 जागांवर आघाडीवर…..भाजपला बहुमत….
 
पनवेल महापालिका निवडणूक निकाल: शिवसेना 1 जागेवर विजयी…शेकाप, कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, मनसेचा सुपडा साफ….भाजपला एकहाती सत्ता……
 
पनवेल महापालिका निवडणूक निकाल: भाजपचे 44 पैकी 37 जागांवर उमेदवार विजयी…..भाजपला स्पष्ट बहुमत मिळणार असल्याचे स्पष्ट….!
 
पनवेल महापालिका निवडणूक निकाल: भाजपची 44 जागांवर आघाडी….भाजपची सत्ता येणार हे स्पष्ट….पनवेलमध्ये पहिलीच सत्ता भाजपच्या हाती….
 
पनवेल महापालिका निवडणूक निकाल: भाजपची घोडदौड सुरूच…..भाजप 42 तर शेकाप 15 जागांवर आघाडीवर….भाजप सत्तेपासून काही पावलंच दूर….
 
पनवेल महापालिका निवडणूक निकाल: भाजपचा विजय हा पैशाचा विजय… दारू विक्रेते, गुंड निवडून आले – विवेक पाटील, शेकाप

पनवेल महापालिका निवडणूक निकाल: पनवेलमध्ये भाजपची बहुमताकडे वाटचाल…शेकाप पिछाडीवर….
 
पनवेल महापालिका निवडणूक निकाल: भाजप 37 तर शेकाप 15 जागांवर आघाडीवर
 
पनवेल महापालिका निवडणूक निकाल: पनवेलमध्ये सत्ता कुणाची येणार हे जवळपास स्पष्ट झालंय….भाजप 34 जागांवर आघाडीवर…तर शेकाप 15 जागांवर आघाडीवर…भाजप कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाला सुरूवात…

पनवेल महापालिका निवडणूक निकाल: पनवेलमध्ये सत्ता कुणाची येणार हे जवळपास स्पष्ट झालंय….भाजप 34 जागांवर आघाडीवर…तर शेकाप 15 जागांवर आघाडीवर…भाजप कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाला सुरूवात…
 
पनवेल महापालिका निवडणूक निकाल: भाजपची 34 जागांवर आघाडीवर सत्तेकडे वाटचाल…. शेकापला 15 आणि शिवसेना अवघ्या 1 जागेवर आघाडीवर
 
पनवेल महापालिका निवडणूक निकाल: भाजपची 34 जागांवर आघाडी, शेकापला 15 आणि शिवसेना अवघ्या 1 जागेवर आघाडीवर
 
पनवेल महापालिका निवडणूक निकाल: प्रभाग क्रमांक 18 मधून शेकापचे चारही उमेदवार विजयी…..
 
पनवेल महापालिका निवडणूक निकाल: भाजप 34, शिवसेना 1, शेकाप महाआघाडी 15 जागा

पनवेल महापालिका निवडणूक निकाल: पनवेलमध्ये भाजपच्या यशाचा कार्यकर्त्यांकडून जल्लोष….भाजपने 20 जागांवर तर शेकाप 6 जागांवर विजयी…
 
पनवेल महापालिका निवडणूक निकाल: भाजपची जोरदार मुसंडी, आघाडी असलेल्या 30 पैकी 23 जागांवर विजय
 
पनवेल महापालिका निवडणूक निकाल: प्रभाग क्रमांक 5 मधून भाजपचे उमेदवार विजयी…..
 
पनवेल महापालिका निवडणूक निकाल: 30 पैकी 20 जागांवर भाजपचे उमेदवार विजयी….शेकाप 15 जागांवर आघाडीवर तर सेना 1 जागेवर आघाडीवर…
 
पनवेल महापालिका निवडणूक निकाल: 30 पैकी 22 जागांवर भाजपचे उमेदवार विजयी….शेकाप पिछाडीवर…
 
राष्ट्रवादीचे सुनील घरत यांची मुलगी शिवानी घरत यांचा प्रभाग क्रमांक 17 मधून पराभव
 
पनवेल महापालिका निवडणूक निकाल:
कळंबोली प्रभाग क्रमांक 7 – भाजपाचा 4 जागांवर विजय
अमर पाटील
विद्या गायकवाड
प्रमिला पाटील
राजेंद्रकुमार शमा
प्रभाग क्रमांक 4 – भाजपाचे सर्व उमेदवार विजयी

पनवेल महापालिका निवडणूक निकाल: पनवेलचे माजी नगराध्यक्ष शेकापचे संदीप पाटील पराभूत

पनवेल महापालिका निवडणूक निकाल: बालेकिल्ल्यात शेकापला मोठा धक्का, कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेससोबत लढूनही शेकाप पिछाडीवर…भाजपने दिला मोठा झटका…भाजपची मोठ्या यशाकडे आगेकूच…
 
पनवेल महापालिका निवडणूक निकाल: भाजपची मोठ्या यशाकडे घोडदौड कायम, 28 जागांवर आघाडी…तर शेकापची 11 जागांवर आघाडी….
 
पनवेल महापालिका निवडणूक निकाल: दिग्गज नेत्यांना जोरदार फटका
 
राष्ट्रवादीचे सुनील घरत यांची मुलगी शिवानी घरत यांचा पराभव
 
शेकापचे संदीप पाटील यांचा पराभव
 
कॉंग्रेसचे लतीफ शेख यांचा पराभव
 
पनवेल महापालिका निवडणूक निकाल: –
प्रभाग क्रमांक 14 क मध्ये भाजपचे मनोहर म्हात्रे 6885 मतांनी विजयी
 
प्रभाग क्रमांक 14 ब मध्ये शेकापच्या सारिका अतुल भगत 7059 मतांनी विजयी
 
प्रभाग क्रमांक 14 अ मध्ये भाजपच्या हेमलता म्हात्रे 7479 मतांनी विजयी

पनवेल मनपा : भाजपाची जोरदार मुसंडी, आघाडी असलेल्या 23 पैकी 19 जागांवर विजय.
 
भिवंडी मनपा निवडणूक मतमोजणी : भाजपा व काँग्रेसमध्ये आघाडीमध्ये चढाओढ सुरू.
 
पनवेल महापालिका निवडणूक निकाल: प्रभाग क्रमांक 11, 4, 17, 14 मधून भाजपचे 15 उमेदवार विजयी…..
 
पनवेल महापालिका निवडणूक निकाल: भाजपला याही निवडणूकीत मोठं मिळत असल्याचं चित्र….पनवेलमध्ये भाजपचे सात उमेदवार विजयी….
 
पनवेल महापालिका निवडणूक निकाल: भाजपचा जोर कायम, पनवेलमध्ये भाजप 20 जागांवर, शेकाप 11 जागांवर तर शिवसेना एका जागेवर आघाडीवर…..
 
पनवेल महापालिका निवडणूक निकाल: भाजप घोडदौड सुरूच…शेकापला मागे टाकत भाजप 19, शेकाप 8, कॉंग्रेस 1 आणि शिवसेना एका जागेवर आघाडीवर…..भाजपचा 4 जागांवर विजय….
 
पनवेल महापालिका निवडणूक निकाल: भाजपला मोठं यश, प्रभाग क्रमांक 17 मधून भाजपचे 4 उमेदवार विजयी….शेकापला मोठा धक्का….!
 
पनवेल महापालिका निवडणूक निकाल: भाजपला मोठं यश, पनवेलमध्ये भाजपचे 4 उमेदवार विजयी….
 
पनवेल महापालिका निवडणूक निकाल: पनवेलमध्ये भाजप 13, शेकाप 9, काँग्रेस 1 जागेवर आघाडीवर…
 
पनवेल महापालिका निवडणूक निकाल: पनवेलमध्ये शेकापला मोठा धक्का, शेकाप पिछाडीवर भाजप 13, शेकाप 6 जागांवर आघाडीवर…
 
पनवेल महापालिका निवडणूक निकाल: पनवेल महापालिका निकालाचा पहिला कल हाती, भाजप 13, शेकाप 6 जागांवर आघाडीवर…भाजपला मोठं यश….
 
पनवेल महापालिका निवडणूक निकाल: पनवेलमध्ये कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शेकाप या महाआघाडीची चांगली सुरूवात…शेकापने दोन जागांवर घेतली आघाडी तर भाजप 1 जागेवर आघाडीवर….