रविवार, 28 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मुंबई , सोमवार, 19 ऑगस्ट 2019 (10:08 IST)

कॉंग्रेसची २५ ऑगस्टला निघणार ‘पोलखोल यात्रा’

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपविरोधातील काँग्रेसची ‘पोलखोल यात्रा’ २० ऑगस्ट ऐवजी २५ ऑगस्ट रोजी सुरू होणार आहे. २० ऑगस्ट रोजी काँग्रेसचे दिवंगत नेते आणि माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची जयंती असल्याने ही यात्रा पुढील ढकलण्यात आली आहे. कॉंग्रेस नेते नाना पटोले ही यात्रा काढणार आहेत. मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या मोजरी गावातून महाजनादेश यात्रेस सुरुवात केली होती तिथूनच कॉंग्रेसही पोलखोल यात्रा सुरू करणार आहे .
 
दरम्यान, कोल्हापूर, सांगलीच्या पुरग्रस्तांसाठी राज्य सरकारने काढलेल्या जीआरबाबत नाना पटोले यांनी अकोला येथे पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यावर ‘दुसरा बाजीराव पेशवा आणि फडणवीस यांचे काम सारखेच’ अशी टीका केली होती. दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेच्या दुसऱ्या टप्प्यास नंदुरबार येथून सुरुवात होणार आहे. तर पैठण येथील संत एकनाथ महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेऊन राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेस १९ ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे.