बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 5 ऑगस्ट 2017 (11:17 IST)

प्रकाश मेहतांनी यांची राजीनाम्याची तयारी

एसआरए घोटाळ्यामुळे अडचणीत आलेले गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनी अखेर पद सोडायची तयारी दाखवलीय, मुख्यमंत्री म्हटले तर मी पद सोडायला तयार आहे, चौकशी पूर्ण होईपर्यंत पदापासून दूर होईन. असंही प्रकाश मेहता यांनी सांगितलं आहे. पण मेहतांच्या या निवेदनात मुख्यमंत्र्यांनी सांगितलं तर राजीनामा देईन, असा आवर्जून उल्लेख करत राजीनाम्याच्या निर्णयाचा चेंडू सोईस्करपणे मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात टोलवलाय. 

गेल्या दोन दिवसांपासून विरोधकांनी प्रकाश मेहतांच्या राजीनाम्यावरून सभागृहाचं कामकाज रोखून धरलंय. प्रकाश मेहतांनी स्वतःहून मंत्रीपदाचा स्वत:हून राजीनामा दिला पाहिजे किंवा मुख्यमंत्र्यांनी तरी त्यांना मंत्रीमंडळातून हटवलं पाहिजे, अशी ठाम भूमिका अजित पवारांनी सभागृहात मांडली. त्यानंतर प्रकाश मेहतांनी स्वतःहून राजीनाम्याची तयारी दाखलवीय.