1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

नाट्यगृहाचा वाद चिघळला तर टीका मनसेच्या वर्मी

नाट्य अभिनेते प्रशांत दामले यांनी नाशिकच्या सर्वात मोठ्या कालिदास कलामंदिरचे सोशल मिडीयावर वाभाडे काढल्यावर हे सर्व सत्ताधारी मनसेच्या जिव्हारी लागले आहे. तुम्हाला जर इतका त्रास होता आणि राजसाहेब तुमचे मित्र आहेत तर तुम्ही त्यांना का सांगितले नाही असे मत अमेय खोपकर यांनी दामले यांना विचारला आहे. तर मनपा प्रशासनाने आज कालिदासची पाहणी केली मात्र नेहमी प्रमाणे हात वर करत आचारसंहिता म्हणून काम करता येणार नाही असे मानत मनपाने सांगितले आहे.
 
प्रशांत दामले यांनी त्यांच्या फेसबुकवर कालिदास कलामंदिर या नाट्यगृहाचे दुर्दशा कशी झाली आहे. हे फोटो द्वारे शेअर केले होते.तर त्याबाबत जोरदार टीका सुद्धा केली होती. यावर अनेक नाट्यप्रेमी आणि नागरिकांनी आपले संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली होती. त्यामुळे हे सर्व मनसेच्या जिव्हारी लागले आहे. यावर मनसेच्या अमेय खोपकर यांनी दामले यांच्यावर टीका केली असून, निवडणुकीच्या तोंडावर मनसेला बदनाम का करत आहेत असा प्रश्न विचारला आहे.तर नाशिकमधील कामे लोकांना कुपत आहेत असेही त्यांनी त्यांच्या पेजवर व्हिडियो द्वारे मत व्यक्त केले आहे.