रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 2 जुलै 2024 (08:21 IST)

हिंदू समाजाला हिंसक म्हटल्या प्रकरणात राहुल गांधी यांनी जाहीर माफी मागावी- देवेंद्र फडणवीस

devendra fadnavis
लोकसभेत 1 जुलै रोजी राहुल गांधी यांनी आपल्या वक्तव्यामध्ये हिंदूंना हिंसक म्हटले. त्यांनी समस्त हिंदू समाजाचा अपमान केला असून त्यांचे वक्तव्य आक्षेपार्ह ,चुकीचे आहे. राहुल गांधी  यांनी आपले वक्तव्य मागे घेत संसदेत संपूर्ण हिंदू समाजाची जाहीर माफी मागावी असे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले. 
 
 पंकजा मुंडे यांना विधानपरिषदेची उमेदवारी जाहीर केल्याबद्दल ते आनंदी असल्याचे सांगितले. पंकजा मुंडे यांना भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याचा आम्ही आम्हा सगळ्यांचा आग्रह होता त्यामुळे त्यांना भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय समितीने उमेदवारी देण्याच्या प्रस्ताव मान्य केला बद्दल मी त्यांचे आभारी आहे. 
 
Edited by - Priya Dixit