मंगळवार, 12 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 8 जानेवारी 2021 (10:53 IST)

पुढील तीन दिवस पावसाचा अंदाज

Rain forecast
मुंबई आणि पुण्यासह कोकण विभाग आणि मध्य महाराष्ट्रात पुढील तीन दिवस पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मराठवाडा आणि विदर्भातही काही ठिकाणी पाऊस होणार आहे. दक्षिण मध्य अरबी समुद्रापासून मध्य महाराष्ट्रापर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने राज्यात पावसाळी वातावरण आहे. डिसेंबरप्रमाणेच जानेवारीच्या सुरुवातीपासून राज्यात थंडीच्या वाटेत कमी दाबाच्या क्षेत्रांचे आणि समुद्रातून येणाऱ्या बाष्पाचे अडथळे आले. त्यामुळेच थंडीची तीव्रताही कमी झाली. पुणे शहरातही बहुतांश भागात अवकाळी पाऊस झाला आहे.
 
नाशिकच्या देवळा तालुक्यातल उत्तर भागात अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली. त्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय.  देवळाच्या लोहणेर, विठेवाडी ,भऊर, सावकी ,खामखेडा परिसराला बेमोसमी पावसानं झोडपलं. गहु ,हरभरा पिकाला फटका बसलाय.तर काढणीला आलेला कांदा शेतात भिजलाय. देवळ्यासह सटाणा आणि मनमाड परिसरातही पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या.
 
रायगडमध्येही अवकाळी पावसानं शेतीचं मोठं नुकसान झालंय. महाड,  पोलादपूर, कर्जत, खालापूर आणि माणगावला जोरदार पावसानं दणका दिलाय. आंबा पिकासह कडधान्यालाही पावसाचा फटका बसलाय. गुरुवारी संध्याकली जिल्ह्याच्या अनेक भागात कमी अधिक प्रमाणात पावसानं हजेरी लावली . महाड, पोलादपूर तालुकयात मुसळधार पाऊस झाला.