गुरूवार, 14 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: कोल्हापूर , गुरूवार, 8 जून 2017 (10:09 IST)

मुख्यमंत्र्यांच्या धमकीला मी घाबरत नाही - राजू शेट्टी

शेतकरी नेत्यांच्या कुडल्या बाहेर काढण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या धमकीला मी घाबरत नाही, असे म्हणत खासदार राजू शेट्टी यांनी थेट मुख्यमंत्र्यांनाच खुले आव्हान दिले आहे. मुख्यमंत्र्यांनी पहिली माझीच कुंडली काढावी, अश्‍या धमक्‍यांना मी भीक घालत नाही असे राजू शेट्टी यांनी सांगीतले आहे. तर माझी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार हे आपल्या सोईचे घेणे आणि गैरसोईचे सोडू देणे ही त्यांची ख्याती असल्याची बोचरी टीका ही खासदार राजू शेट्टी यांनी केली आहे. ते कोल्हापुरात बोलत होते.
 
मध्यप्रदेशमध्ये जे घडले ते पुन्हा महाराष्ट्रात घडवणार अहात का ? महाराष्ट्रातील शेतकऱ्यांवर आता गोळी बार करनार का असा सवाल ही राजू शेट्टी यांनी विचारलाय. शेतकऱ्यांना 1 लाख शेततळी देणार होता त्याचे काय झाले ?10 हजार सोलर पंप देणार होता त्याचे काय झाले असा ही प्रश्न राजू शेटटी यांनी उपस्थित केला आहे.

मुख्यामंत्र्यांनी स्वत:कडे गृहखाते ठेवले आहे, मात्र राज्यातील पोलिस अस्वस्थ आहेत. सध्या पोलिस दलात मोठ्ठा भ्रष्टाचार सुरु असल्याची माहिती खद्द एका पोलिस अधिकाऱ्यानेच आपल्याला दिली असून त्यामुळे कुठे नेवून ठेवला आहे महाराष्ट्र असे म्हणण्याची वेळ मुख्यमंत्र्यांनीच अणली आहे असं राजू शेट्टी यांनी सांगितले आहे.