बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

आठवले यांचे वादग्रस्त विधान

तरुणांनी सैन्यात जावं तिथं चांगलं खाण्यासोबतच परदेशी दारुही प्यायला मिळेल, असं वादग्रस्त विधान केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केलं आहे.

दलित समाजाला सैन्यात आरक्षणाची मागती करताना त्यांनी हे वादग्रस्त विधान केलं आहे. “बेरोजगार राहून हातभट्टीची देशी दारु पिण्याऐवजी सैन्यात भरती व्हावं, तिथे चांगलं खाणं इंग्रजी दारु प्यायला मिळेल,” असंही आठवलेंनी सांगितलं.
 
आठवले म्हणाले की, “आर्मीमध्ये आम्हाला आरक्षण द्या. इथे बरोबर खायला मिळत नाही, प्यायला मिळत नाही. मिलिटरीमध्ये चांगलं खायला, प्यायला मिळतं. रम मिळते, ब्रॅण्डी मिळते.” असे सांगितले आहे.