शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 2 नोव्हेंबर 2022 (20:57 IST)

कडू कसे आमदार होतात तेच पाहतो, अशा शब्दांच राणा यांनी कडू यांना इशारा दिला

ravi rana
दोन अपक्ष आमदारांमध्येच सध्या जुंपली आहे. बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यात गेल्या काही काळापासून टीका सुरु झाली आहे. या वादावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पडदा टाकला असताना पुन्हा हा वाद उफाळून आला आहे. बच्चू कडूंच्या सभेमधील वक्तव्यानंतर राणा यांनी आज घरात घुसून मारण्याची हिंमत असल्याचा इशारा कडू यांना दिला आहे.
 
कडू यांच्या सभेनंतर राणा यांनी पुन्हा फडणवीसांची भेट घेतली. यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना राणा यांनी मी सन्मानाने दोन पावले मागे झालो. कडू चार पावले मागे गेले. जर आम्हाला सातत्याने कोणी धमक्या देत असेल तर त्याला घरात घुसून मारण्याची हिंमत आहे. कडू कसे आमदार होतात तेच पाहतो, अशा शब्दांच राणा यांनी कडू यांना इशारा दिला आहे.
 
उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदाची घमेंड होती, त्यांना राजीनामा द्यावा लागला. ज्या मुख्यमंत्र्याला घमेंड होते, त्याच्यावर हीच वेळ येते. कडू कसे आमदार होतात, पुढच्या निवडणुकीला कसे निवडून येतात ते मी पाहतो, असा इशारा राणा यांनी दिला आहे. घाबरत कोणीच नाही. मात्र प्रत्येकाने एकमेकांचा आदर केला पाहिजे. काही चुका त्यांच्याकडून झाल्या त्यांनी पावले मागे येऊन दिलगीरीही व्यक्त केली. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांनी देखील माझ्या वक्तव्यावर आक्षेप घेतला. मीही दोन पावले जाऊन माफी मागितली, असे राणा म्हणाले.

Edited By- Ratnadeep Ranshoor