मंगळवार, 4 नोव्हेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 21 ऑक्टोबर 2021 (16:17 IST)

चालत्या ट्रेनमध्ये महिलेवर बलात्कार, लोक 8 मिनिटे व्हिडिओ बनवत राहिले, अमेरिकेत लज्जास्पद घटना

Rape of a woman on a moving train
फिलाडेल्फिया- अमेरिकेच्या फिलाडेल्फियामध्ये हृदय पिळवटून टाकणाऱ्या एका घटनेत चालत्या ट्रेनमध्ये एका महिलेवर बलात्कार झाला. घटनेच्या वेळी ट्रेनमध्ये अनेक लोक उपस्थित होते. ती महिला ओरडत राहिली आणि लोक घटनेचे व्हिडिओ बनवत राहिले. महिलेच्या मदतीसाठी एकही व्यक्ती पुढे आली नाही.
 
सांगितले जात आहे की ही घटना फिलाडेल्फियामध्ये 13 ऑक्टोबर रोजी घडली. बलात्कारी प्रथम महिलेसोबत अश्लील कृत्य करत होता. यानंतर त्याने महिलेवर चालत्या ट्रेनमध्ये 8 मिनिटे बलात्कार केल्याची घृणास्पद कृत्य केलं.
 
या दरम्यान, महिला ट्रेनमध्ये उपस्थित असलेल्या लोकांकडून मदतीची याचना करत राहिली. ती लोकांना पोलिसांना फोन करण्यास मदत करण्यास सांगत होती. तिने  लोकांसमोर मदतीसाठी हात जोडले पण असे असूनही या लोकांनी काहीच केले नाही.
 
आश्चर्याची गोष्ट म्हणजे, त्या महिलेला मदत करण्याऐवजी काही लोक घटनेचा व्हिडिओ बनवत राहिले. फिलाडेल्फिया पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.