बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 21 ऑक्टोबर 2021 (16:00 IST)

राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंविरूध्द निवडणूक लढविणार्‍या भाजपच्या खा. रक्षा खडसेंना मोठा धक्का

जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीत  भाजपाला मोठा धक्का बसला आहे. भाजपच्या खासदार रक्षा खडसे , विधानपरिषदेमधील आमदार स्मिता वाघ  यांचा अर्ज बाद झाला आहे.
 
मुक्ताईनगर विकास सहकारी सोसायटी  मतदारसंघात महिला राखीव तसेच ओबीसी प्रवर्गातून रक्षा खडसे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. तर याच मतदार संघातून त्यांचे सासरे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे  हे देखील उमेदवार म्हणून उभे राहिले होते. त्यामुळे या निवडणुकीला जास्त महत्त्व प्राप्त झाले होते. मात्र ऐनवेळी रक्षा खडसे  यांचा उमेदवारी अर्ज बाद झाल्याने एकनाथ खडसे यांचा विजय निश्चित मानला जात आहे. तर दुसरीकडे अमळनेर विकास सोसायटीमधून स्मिता वाघ यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र त्यांचाही अर्ज बाद झाल्याने अमळनेर विकास सोसायटी मधून काँग्रेसचे आमदार अनिल पाटील यांचा बिनविरोध विजय निश्चित झाला आहे.