शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 21 ऑक्टोबर 2021 (15:35 IST)

नालासोपारा: दोन गटांत हाणामारी, व्हिडिओ व्हायरल

नालासोपारामध्ये तरुणांच्या दोन गटांत हाणामारी झाल्याची घटना समोर आली असून याचं व्हिडिओ व्हायरल होत आहे. नालासोपारा पूर्वेकडील रेल्वे ट्रॅक जवळ असलेल्या यशवंत विवा मॉल टाऊनशिप जवळ ही घटना घडली आहे. 
 
येथे दोन गटात झालेल्या हाणामारीचा प्रकार मोबाइल कॅमेऱ्यात कैद करण्यात आला असून त्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. सोसोयटीच्या जागेचा बोर्ड लावण्याच्या वादातून ही मारहाण झाली असल्याची माहिती समोर येत आहे.
 
व्हायरल व्हिडीओत हातात काठी घेऊन जमावाने एकाला बेदम मारहाण करत असल्याचं दिसून येत आहेत. या घटनेत आचोले पोलीस ठाण्यात 7 जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी 2 जणांना अटक केली आहे.