संजय राऊत यांना हटवा - भिडे

sambhaji bhide
Last Modified शुक्रवार, 17 जानेवारी 2020 (16:42 IST)
शिवसेना देशभरात वाढावी अशी माझी
इच्छा आहे, कारण अन्न, पाणी, वाऱ्याइतकीच शिवसेनेची देशाला आवश्यकता आहे. मात्र त्यासाठी संजय राऊत यांना पदावरुन हटवा, अशी हात जोडून विनंती ‘शिवप्रतिष्ठान’चे नेते संभाजी भिडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे (Sambhaji Bhide appeals Uddhav Thackeray) केली. संजय राऊत यांनी छत्रपती उदयनराजे भोसले यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ भिडेंनी ‘सांगली बंद’पुकारला आहे
‘शिवसेना याचा अर्थ छत्रपती परंपरेचा चालू असलेला जो श्वासोच्छ्वास आहे, ते लक्षात घेऊन शिवसेनाप्रमुखांना मी एकच विनंती करेन, की त्यांनी आवरावं. शिवसेनेला ज्याच्यामुळे बदनाम होण्याची वेळ येईल, अशी विधानं करणारे राऊत, त्यांना स्थानावरुन मोकळं करावं, अशी इच्छा आहे’ असं संभाजी भिडे सांगलीत म्हणाले आहेत.

‘शिवसेना ही सबंध देशात गेली पाहिजे, देशभरात वाढली पाहिजे, अत्यंत आवश्यक आहे. हिंदुस्थानला राष्ट्र म्हणून टिकायचं असेल, हिंदूराष्ट्र म्हणून टिकायचं असेल, तर शिवसेना ही अत्यंत अत्यंत अत्यंत, हो… अन्न, पाणी, वायू, सूर्यप्रकाश हे जीवन जगण्यासाठी लागतो. तशी शिवसेना आहे. तर माझी कळकळीची प्रार्थना आहे, उद्धवरावांना, संजय राऊतांना बाजूला करावं. शिवसेनेविषयी लोकांचं मत बिघडणार नाही, याची काळजी घ्यावी’ असं आवाहनही संभाजी भिडेंनी केलं आहे.


यावर अधिक वाचा :

डोळ्यांचा त्रास कमी होण्यासाठी Whats-app आणलं खास फीचर

डोळ्यांचा त्रास कमी होण्यासाठी Whats-app आणलं खास फीचर
Whatsapp ने बहुप्रतीक्षित डार्क मोड हे फीचर रोलआउट करण्यास सुरूवात केली आहे. ...

मराठी साहित्य संमेलन उस्मानाबादः फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या ...

मराठी साहित्य संमेलन उस्मानाबादः फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या अध्यक्षतेखाली आज उद्घाटन
93वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उस्मानाबाद येथे होत आहे.

Kashmir Internet Shutdown: सुप्रीम कोर्ट - जम्मू-काश्मीर ...

Kashmir Internet Shutdown: सुप्रीम कोर्ट - जम्मू-काश्मीर सरकारने संचारबंदी निर्णयाचा आढावा घ्यावा
काश्मीरमध्ये इंटरनेट बंद ठेवण्याची अजूनही गरज आहे का, याचा आढावा घेण्याचे आदेश सुप्रीम ...

JNU हिंसाचार: कुलगुरू जगदीश कुमार - JNUSU अध्यक्ष आयेशी ...

JNU हिंसाचार: कुलगुरू जगदीश कुमार - JNUSU अध्यक्ष आयेशी घोषला भेटणं माझी एकट्याचीच जबाबदारी नाही
'जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे (JNU) कुलगुरू एम. जगदीश कुमार हे उजव्या विचारसरणीकडे झुकलेले ...

सिद्धिविनायक मंदिर पाच दिवस राहणार बंद

सिद्धिविनायक मंदिर पाच दिवस राहणार बंद
मुंबई- 15 जानेवारी ते 19 जानेवारी या दरम्यान प्रभादेवी येथील सिद्धिविनायकाचे दर्शन बंद ...

'एटीएम'मधून पैसे काढणे महागणार?

'एटीएम'मधून पैसे काढणे महागणार?
'एटीएम'मधून पैसे काढण्यासाठी ग्राहकांना जादा पैसे मोजावे लागण्याची शक्यता आहे. कारण ...

एअर होस्टेस व्हायचं स्वप्न बघत असाल तर हे वाचा...

एअर होस्टेस व्हायचं स्वप्न बघत असाल तर हे वाचा...
विमानात आपण अनेकदा प्रवास केलाच असणार. विमानात प्रवेश करताच काही देखण्या मुली हसून ...

'नाणार' नाहीच, शिवसेनेचा विरोध कायम

'नाणार' नाहीच, शिवसेनेचा विरोध कायम
'नाणार' प्रकल्पासंबंधीची शिवसेनेचे मुखपत्र 'सामना'मध्ये प्रसिद्ध झालेली जाहिरात आणि ...

केंद्राने निधी न दिल्यामुळे महामार्गांची कामे रखडली

केंद्राने निधी न दिल्यामुळे महामार्गांची कामे रखडली
केंद्र सरकारने रस्ते विकासाच्या योजनांचा निधी न दिल्यामुळे राज्यातील राष्ट्रीय ...

Facebook Liteला डार्क मोड सपोर्ट मिळाला, जाणून घ्या कसे ...

Facebook Liteला डार्क मोड सपोर्ट मिळाला, जाणून घ्या कसे कराल एक्टिवेट
प्रसिद्ध सोशल मीडिया कंपनी फेसबुक (Facebook)ने आपल्या लाइट व्हर्जन (Facebook Lite)च्या ...