गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 23 मे 2023 (08:34 IST)

साई संस्थानावर नोटबंदीचा परिणाम नाही; दानात 2000 रुपयांच्या नोटांचं प्रमाण अत्यल्प

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने शुक्रवारी आपली सर्वोच्च मूल्य असलेली 2,000 रुपयांची नोट चलनातून मागे घेण्याची घोषणा केली आहे. आरबीआयच्या या निर्णयामुळे पुन्हा एकदा सर्वसामान्यांना फटका बसण्याची शक्यता आहे. परंतु देशातील सर्वात मोठ्या धार्मिक स्थळांपैकी एक असलेले शिर्डी साई बाबा संस्थानावर या नोटबंदीचा फारसा परिणाम झाला नाही.
 
देशभरातून दररोज हजारो भाविक साईबाबांच्या दर्शनाला शिर्डीत येत असतात. हे भाविक साईचरणी 10 रुपयांपासून ते लाखो रुपयांचे दान अर्पण करतात. साई संस्थान आलेल्या दानाची मोजदाद आठवड्यातून मंगळवार आणि शुक्रवार या दोन दिवशी करते आणि दानात आलेली रक्कम तात्काळ बँकेत जमा केली जाते. त्यामुळे आता २ हजार रुपयांच्या नोटांसंदर्भात झालेल्या निर्णयामुळे साईबाबा संस्थानवर कुठलाही परिणाम होणार नाही.
 
खरंतर 2 हजार रुपयांच्या नोटा दानात येण्याचं प्रमाण मागील काही महिन्यांपासून अत्यल्प होतं. तसेच मागील नोटबंदीनंतर हजार आणि पाचशेच्या नोटा मोठ्या प्रमाणात दानात उपलब्ध झाल्या होत्या. त्यामुळे आता आरबीआयने घेतलेल्या निर्णयानंतर 2 हजारांच्या नोटाचे दान आगामी काळात वाढणार का हे बघणं महत्वाचं ठरणार आहे
 
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने शुक्रवारी आपली सर्वोच्च मूल्य असलेली 2,000 रुपयांची नोट चलनातून मागे घेण्याची घोषणा केली. परंतु या नोटा कायदेशीर निविदा म्हणून सुरू राहती
 
परंतु एकावेळी फक्त 20,000 रुपयांच्या नोटा बदलण्याची मर्यादा आरबीआयने घालून दिली आहे. सेंट्रल बँकेने लोकांना 2,000 रुपयांच्या नोटा जमा करण्याचा सल्ला दिला आहे. तसेच बँकांना 2,000 रुपयांच्या नोटा तात्काळ देणे बंद करण्याचा सल्ला दिला आहे.
 
Edited By- Ratnadeep Ranshoor