बुधवार, 29 ऑक्टोबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 25 ऑगस्ट 2017 (17:32 IST)

गोव्यात जाऊन शाकाहाराचा आग्रह धरा : सामना

samana

महाराष्ट्रात आम्ही काय खावे व खाऊ नये, हे सांगण्यापर्यंत अनेकांची मजल गेली. मात्र, आम्हाला शहाणपणा शिकवणारे हे लोक गोव्यात जाऊन शाकाहाराचा आग्रह धरण्याची हिंमत दाखवतील का, असा सवाल शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’तून विचारण्यात आला आहे.

 भाजपच्याच राज्यात इथे मुबलक ‘बीफ’ मिळत आहे. इथे महाराष्ट्रात आम्हाला शहाणपणा शिकवणाऱ्यांनी गोव्यात जाऊन पूर्ण शाकाहारी राज्य आणावे. बोला, आहे का हिंमत?, असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आहे. इथे तुम्ही एकगठ्ठा मतांची मस्ती दाखवणार असाल तर ती तुम्हालाच लखलाभ ठरो. पण पैशाची मस्ती दाखवून अंगावर याल तर, ते मात्र आता मराठी माणूस सहन करणार नाही, असा इशाराही या अग्रलेखातून शिवसेनेने दिला आहे.