बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 17 फेब्रुवारी 2021 (08:03 IST)

संजय राठोड यांनी राजीनामा दिलेला नाही - हसन मुश्रीफ

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात वनमंत्री संजय राठोड यांचे नाव समोर आल्यानंतर त्यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी केली जात आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संजय राठोड यांनी राजीनामा दिलेला नाही. यांच्या समर्थनार्थ दिग्रस मतदारसंघात मोर्चादेखील निघालेला आहे. त्यामुळे चौकशी झाल्याशिवाय आरोप करून एखाद्याला आयुष्यातून उठवणे बरे नाही. भाजपची सत्ता गेल्यापासून ते अस्वस्थ आहेत. त्यामुळे काहीही घडले की महाविकास आघाडी बदनाम कशी होईल, यासाठी भाजप सातत्याने प्रयत्न करत असल्याचे मंत्री मुश्रीफ यांनी म्हटले आहे.
 
एका मराठी वृत्तवाहिनीशी ते अहमदनगरमध्ये बोलत होते. यावेळी त्यांनी विविध विषयांवर भाष्य केले. भाजपकडून विरोधी पक्षीय नेत्यांच्या मागे ED लावून त्यांना अडचणीत आणण्याचा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांनी वेळोवेळी केला आहे. यावर मंत्री मुश्रीफ म्हणाले की, “ED आणि CBI यांना चौकशी करण्याच्या अधिकारासंबंधी कायदा केला जाणार आहे.