बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: शनिवार, 13 फेब्रुवारी 2021 (11:20 IST)

संजय राठोड यांच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा

पुण्यातील तरुणीच्या आत्महत्या प्रकरणावरुन भाजपाने पहिल्यांदाच जाहीरपणे शिवसेना नेते संजय राठोड यांचं नाव घेतलं असून कारवाई करण्याची मागणी केली आहे. भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी संजय राठोड यांच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
 
चित्रा वाघ यांनी ट्विट केलं असून एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये त्यांनी पूजा चव्हाण घटनेत समोर आलेले सगळे अपडेट्स पाहता याचा थेट रोख शिवसेना मंत्री संजय राठोडांकडे जातो असं त्यांनी म्हटलं आहे.
 
“पूजा चव्हाण या तरुणीची आत्महत्या नसून हत्या असल्याचे बरेच अपडेट्स गेल्या दोन दिवसांत समोर आले आहेत. त्यामध्ये जवळपास १० ते ११ ऑडिओ क्लिप्स व्हायरल झाल्या आहेत. काही फोटो समोर आले आहेत. या सगळ्या गोष्टींमधून तिला आत्महत्येसाठी परावृत्त करण्यापासून ते आत्महत्या झाल्यानंतर दरवाजा तोड पण तिचा मोबाइल ताब्यात घे असं सांगताना मंत्री दिसत आहेत. पोलीस याबद्दल अजूनही स्पष्टता देत नाहीत,” असा आरोप चित्रा वाघ यांनी केला आहे.