बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 13 फेब्रुवारी 2021 (11:12 IST)

संजय राठोड यांचे समर्थक सोशल मीडियावर अॅक्टिव्ह, अनेक फोटो, मॅसेज, कमेंट्स केल्या पोस्ट

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी थेट शिवसेनेचे नेते मंत्री संजय राठोड यांच्यावर गुन्हा दाखल करा, अशी मागणी चित्रा वाघ यांनी केली आहे. यानंतर आता संजय राठोड यांचे समर्थक सोशल मीडियावर अॅक्टिव्ह झाले आहेत. 
 
संजय राऊत यांच्या समर्थनासाठी सोशल मीडियावर अनेक फोटो, मॅसेज, कमेंट्स पोस्ट केल्या जात आहे. त्याशिवाय सोशल मीडियावर समर्थकांनी त्यांना समर्थन करणारे अनेक बॅनर पोस्ट केले आहेत. फेसबुकवरही त्याच्या समर्थकांनी अनेक बॅनर पोस्ट केले आहेत.
 
“जिसकी कामयाबी रोकी नहीं जा सकती, उसकी बदनामी शुरु की जाती है!!” अशी पोस्ट एका समर्थकाने फेसबुकवर केली आहे. यासह अनेक समर्थकांनी त्यांच्या समर्थनासाठी फेसबुकवर पोस्ट टाकल्या आहेत.