गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 16 फेब्रुवारी 2021 (16:28 IST)

संजय राठोड यांच्या राजीनाम्यावर संजय राऊत यांची प्रतिक्रीया

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात नाव आलेले राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांनी राजीनामा दिल्याची चर्चा आहे. राठोड यांनी मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान असलेल्या मातोश्रीवर राजीनामा पाठवल्याचंही वृत्तात सांगण्यात आलं आहे. राठोड यांच्या राजीनाम्याच्या वृत्तावर शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी भूमिका मांडली आहे.
 
दरम्यान, यासंदर्भात शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना या मुद्द्यावर मौन सोडलं.राऊत म्हणाले, “हा विषय सरकारचा आहे आणि सरकारचे प्रमुख लोक त्यासंबंधात त्यांचं मत व्यक्त करतील किंवा निर्णय घेतील. तसेच संजय राठोड हे शिवसेनेचे प्रमुख मंत्री आहेत. शिवसेनेचा चेहरा आहेत. त्यांच्यावर जे आरोप केले जात आहेत, त्याप्रकरणी पोलीस तपासाचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. त्यासंबंधीची माहिती मुख्यमंत्री घेतील,” असं राऊत म्हणाले. पत्रकारांनी राऊत यांना राठोड यांच्या राजीनाम्याविषयी विचारले. त्यावर राऊत म्हणाले, “राजीनामा दिला की नाही, हे मला माहिती नाही. तुम्हाला याची जास्त माहिती असेल,” असं म्हणत राऊत यांनी प्रश्नाला थेट उत्तर देणं टाळलं.