जावडेकर यांच्या ज्ञानामृताची महाराष्ट्राला गरज नाही : राऊत
प्रकाश जावडेकर दिल्लीत बसून जे ज्ञानामृत देत आहेत त्याची महाराष्ट्राला गरज नाही. त्यांनी मुंबई, पुण्यात बसावे आणि या ठिकाण्याची परिस्थिती पाहावी. त्यांचेही महाराष्ट्राशी नाते आहे, असे सांगत शिवसेनेचे खासदार संज राऊत यांनी केंद्रींयमंत्री जावडेकर यांना टोला लगावला.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात लागू होणार्यान लॉकडाउनला विरोध केला आहे. यावरून राऊत म्हणाले की, ही त्यांच्या पक्षाची राज्याची भूमिका आहे. त्यांची देशपातळीवरील भूमिका निराळी असू शकते. जर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात लॉकडाउन जारी केला तर तेव्हा फडणवीसांची भूमिका काय असेल? तेव्हा महाराष्ट्र सोडून देशात लॉकडाउन करा अशी त्यांची भूमिका असेल का?, असे म्हणत राऊत यांनी फडणवीसांवर निशाणा साधला.
सध्या देशांतर्गत युद्ध आहे. सरसंघचालक मोहन भागवत, भैयाजी जोशी कोरोनामुळे आजारी आहेत, याची फडणवीसांना महिती असेल. मोठ्या व्यक्ती, महाराष्ट्रातील जनता कोरोनाशी झूंज देत आहे. आपल्याला कोरोना होणार नाही आणि विरोधकांनाच होईल हे सत्ताधारी आणि विरोधकांनी डोक्यातून काढले पाहिजे.