श्री क्षेत्र सप्तशृंगी गड : मंदीर अजून सात दिवस बंद
श्री क्षेत्र सप्तशृंगी गडावरील भगवती मंदिराच्या शिखरावर दरड काढण्याचे काम २१ ते २७ जून असे सात दिवस सुरू राहाणार आहे. त्यामुळे भाविकांच्या सुरक्षेसाठी देवीचे दर्शन सात दिवस बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आला आहे अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभाग आणि संस्थांच्या वतीने कळवली आहे. नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय घेतला आहे.
सप्तशृंगी गडावर पायऱ्यांच्या बाजूला १२ जून रोजी दरड कोसळली होती. मात्र संरक्षक बसविण्यात आलेल्या जाळ्यांमध्ये दोन मोठे दगड अडकल्याने अनर्थ टळला होता. राज्यातील विविध भागातून येणाया भाविकांना व पर्यटकांना देवी दर्शनाची गैरसोय होऊ नये म्हणून पहिल्या पायरीजवळ देवीची प्रतीमूर्ती दर्शनासाठी ठेवण्यात आली आहे. या आगोदर सुद्धा अनेकदा दरड कोसळल्या आहेत. मात्र त्यातून जीवित हानी होवू नये म्हणून शासनाने या ठिकाणी जाळ्या बसविल्या होत्या. त्यामुळे कोसळणारी दरड या जाळ्यात अडकते. त्यामुळे होणारा मोठा धोका टाळला.