शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 6 जुलै 2021 (22:41 IST)

पावसाळी अधिवेशनात जनहिताचे निर्णय घेतल्याचे समाधान – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

पावसाळी अधिवेशनाचा कालावधी दोन दिवसांचाच असला तरीही या अधिवेशनात जनतेच्या हिताचे कामकाज करता आले याचे समाधान आहे असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधिमंडळ अधिवेशन संस्थगित झाल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले. या अधिवेशनात ९ विधेयके दोन्ही सभागृहांनी मंजूर केली. या वेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, संसदीय कार्यमंत्री अनिल परब, राज्यमंत्री संजय बनसोडे उपस्थित होते.
या दोन दिवसाच्या अधिवेशनात खालीलप्रमाणे कामकाज झाले त्याविषयी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी माहिती दिली
 
१.मराठा आरक्षणासाठी पन्नास टक्क्यांची मर्यादा शिथील करण्याची केंद्र शासनाला शिफारस करणारा ठराव
२.ओबीसी आरक्षणासाठी केंद्र सरकारकडून इम्पिरिकल डेटा मिळविण्याचा ठराव
३.2014 च्या ईएसबीसी उमेदवारांना मोठा दिलासा. तात्पुरत्या नियुक्त्या, वयोमर्यादेत वाढ
४.लवकरच महाराष्ट्र आयोगामार्फत १५ हजार ५१५ वर्ग एक आणि वर्ग दोनची पदे भरणार तसेच आयोगातील सदस्यांची रिक्त पदे ३१ जुलैपर्यंत भरणार
५. केंद्र सरकारच्या शेतकरी कायद्यांत सुधारणा करून नवे विधेयक सादर
६.आरोग्य विभागास प्राधान्याने निधी ( पुरवणी मागण्या)
७.कैकाडी समाजाचा अनुसूचित जातीमध्ये समावेश करण्याचा ठराव
८.लसीकरण दरमहा वाढीव ३ कोटी डोसेस केंद्राकडून घेण्याबाबत ठराव
२३ हजार १४९ कोटी रुपयांच्या पूरवणी मागण्यांमध्ये ग्रामीण आरोग्य यंत्रणा बळकट करण्यासाठी सर्वाधिक निधी
 
सार्वजनिक आरोग्य विभागासाठी सर्वाधिक ३ हजार ६४४ कोटी ३० लाख ५७ हजार रुपयांची पुरवणी मागणी मंजूर.
कोरोना परिस्थिती,संभाव्य तिसरी लाट लक्षात घेता ग्रामीण आरोग्य व्यवस्था बळकट करण्याला शासनाने प्राधान्य दिले आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाला पुरवणी मागणी मंजूर करतांना याच बाबीकडे विशेषत्वाने लक्ष देण्यात आले आहे.
आरोग्य विभागाच्या पुरवणी मागणीतील महत्वाचे मुद्दे
प्राथमिक आरोग्य केंद्रांकरिता ३१० रुग्णवाहिका (४७ कोटी ५६ लाख ५० हजार)
 
महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य व प्रधानमंत्री जन आरोग्य योजना ( २७२ कोटी ५२ लाख)
 
कोरोना रुग्णांसाठी अत्यावश्यक औषध खरेदी १२२२ कोटी ४४ लाख ५० हजार
 
आपत्कालीन वैद्यकीय सेवा योजनेतील रुग्णवाहिका खर्च, राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाच्या अंमलबजावणीसाठी केंद्र शासनाकडून प्राप्त होणाऱ्या ६० टक्क्यांच्या हिश्शास ४० टक्के राज्य हिश्शाची रक्कम देणे, अर्भक मृत्यू दर कमी करण्यासाठी प्रोत्साहन सहाय्यक अनुदानाची रक्कम, राष्ट्रीय वृद्धापकाळ आरोग्य शुश्रुषा कार्यक्रमांतर्गत ग्रँट मेडकल कॉलेज, जे. जे. रुग्णालयाला निधी
 
कंत्राटी सेवेवर घेण्यात आलेल्या बंधपत्रित व कंत्राटी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मानधनावरील खर्च भागवण्यासाठी निधी
 
या शिवाय सार्वजनिक बांधकाम, पाणी पुरवठा व स्वच्छता, सामाजिक न्याय, उद्योग, उर्जा व कामगार, सहकार- पणन, वैद्यकीय शिक्षण, महिला व बालविकास, गृह, नगरविकास यासह २८ विभागांच्या पुरवणी मागण्यांना मंजूरी. यात संजय गांधी निराधार योजनेसह सामाजिक न्यायाच्या इतर योजना, कर्जमुक्ती आदी बाबींसाठी निधी देण्यात आला आहे.
 
केंद्र शासनाच्या ३ कृषी कायद्यामध्ये महाराष्ट्र राज्याची सुधारणा
शेतकऱ्यांच्या हिताला बाधा पोहचू देणार नाही
 
१.“शेतकऱ्यांचे उत्पादन व्यापार आणि व्यवहार प्रोत्साहन आणि सुविधा) अधिनियम, २०२० ”
२.“शेतकरी (सक्षमीकरण आणि संरक्षण) आश्वासीत किंमत आणि शेती सेवा करार अधिनियम, २०२०”
३.“अत्यावश्यक वस्तू (सुधारणा) अधिनियम, २०२०” हे दोन अधिनियम अनुक्रमे कृषि विभाग व अन्न व नागरी पुरवठा विभागाशी संबंधीत आहेत.
 
या तीन केंद्रीय कायद्यांमध्ये सुधारणा करून विधेयके मांडण्यात आली आहेत. राज्यातील शेतकऱ्यांच्या हिताला बाधा पोहचेल असे कुठलेही निर्णय आम्ही घेणार आहेत.
 
आमच्या सुधारित विधेयकात खालीलप्रमाणे अतिशय महत्वाच्या सुधारणा करण्यात आल्या आहेत
 
१.“शेतकऱ्यांचे उत्पादन व्यापार आणि व्यवहार प्रोत्साहन आणि सुविधा) अधिनियम, २०२० ”
मोठे भांडवलदार व कॉर्पोरेट रिटेलर्सतर्फे शेतकऱ्यांची फसवणूक व छळ होण्याची दाट शक्यता लक्षात घेऊन राज्यांतर्गत व आंतरराज्य अनुसूचित शेतमालाचा व्यापार किंवा व्यवहार करण्यासाठी व्यापाऱ्यास सक्षम प्राधिकाऱ्याकडून लायसन घेणे बंधनकारक असेल.
 
Ø   शेतकरी आणि व्यापारी यांच्यामधील वाद सोडविण्यासाठी नजीकच्या अपील अधिकाऱ्याकडे अपील करता येईल अशी तरतूद करण्यात आली आहे.
 
Ø   एखाद्या व्यापाऱ्याने शेतकऱ्यांची छळवणूक केली तर गुन्हा सिध्द झाल्यास त्यांना तीन वर्षांपेक्षा कमी नसेल इतक्या कारावासाची शिक्षा किंवा पाच लाख रुपयांपेक्षा कमी नसेल इतका दंडाची तरतूद करण्यात आलेली आहे.
 
तसेच शेतकऱ्याच्या छळ याची परिभाषा करुन जेव्हा खरेदी-विक्रीच्या करारानुसार किंवा शेतकऱ्याचा मालाची पोच मिळाल्यानंतर सात दिवसांच्या आत पैसे दिले गेले नाही तर तो छळा चा गुन्हा म्हणून नोंदविला जाईल अशी तरतूद करण्यात आलेली आहे.
 
Ø   राज्य शासनाला राजपत्रात प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेद्वारे सदर कायद्यातील तरतूदींबाबत नियम करण्याचे अधिकार असतील अशी तरतूद करण्यात आलेली आहे.
“शेतकरी (सक्षमीकरण आणि संरक्षण) आश्वासीत किंमत आणि शेती सेवा करार अधिनियम, २०२०:
Ø   शेतकऱ्याच्या तक्रारीचा निपटारा तात्काळ होण्यासाठी अपिलीय अधिकारी व सक्षम अधिकारी यांची व्याख्या करण्यात आली असून त्यानुसार मूळ केंद्र शासनाच्या कायद्यात असलेल्या उपविभागीय अधिकारी ऐवजी राज्य शासन ठरवेल अशा सक्षम अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात येणार
Ø   केंद्र शासनाच्या कायद्यामध्ये किमान आधारभूत किमतीची (MSP) ही तरतूद नाही. MSP ची तरतूद या सुधारणमध्ये करण्यात आलेली आहे.
Ø   शेतकरी व करार करणारी कंपनी (पुरस्कर्ता) यांच्यात परस्पर संमतीने पीक विक्री किंवा खरेदी यासाठीचा करार किमान आधारभूत किंमतीपेक्षा कमी किंमतीने दोन वर्षाच्या कालावधीसाठी करण्यात येईल.
 
३. अत्यावश्यक वस्तू (सुधारणा) अधिनियम, २०२०
 
Ø   केंद्र सरकार जीवनावश्यक वस्तू अधिनियमांतर्गत युध्द, दुष्काळ, असाधारण किंमत वाढ व गंभीर स्वरुपाची नैसर्गिक आपत्ती अशा असाधारण परिस्थितीमध्येच कडधान्ये, डाळी, बटाटा, कांदे, खाद्य तेलबिया व खाद्यतेल इत्यादींचे नियमन करु शकणार आहे.
Ø   सदर वस्तूवर साठा निर्बंध लावण्याबाबत असाधारण किंमतवाढ या एकमेव आधारवरच निर्णय घेण्यात येणार आहे.
Ø   यात राज्य शासनास कोणतेही अधिकार देण्यात आलेले नाहीत. त्यामुळे जीवनावश्यक वस्तू अधिनियमातील उपरोक्त जीवनावश्यक वस्तूंचे नियमन तसेच जीवनावश्यक वस्तूंवर साठा निर्बंध लावण्याचे अधिकार केंद्र शासनासह राज्य शासनासही असतील, अशी सुधारणा राज्य शासनाकडून या विधेयकाद्वारे प्रस्तावित.