मंगळवार, 26 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 6 नोव्हेंबर 2020 (17:59 IST)

पुनश्च हरि ओम असं म्हणता आणि हरिलाच कोंडून ठेवता?

पुनश्च हरि ओम असं म्हणता आणि हरिलाच कोंडून ठेवता? मनसेचे नेते आणि माजी आमदार बाळा नांदगावकर यांनी ठाकरे सरकारला हा प्रश्न विचारला आहे. बाळा नांदगावकर यांनी ट्विट करुन ठाकरे सरकारवर टीका केली आहे. राज्यात बार उघडले गेले, बारची वेळही ठरवून देण्यात आली. त्यानंतर जलतरण तलाव आणि मल्टिप्लेक्स यांनाही संमती देण्यात आली. करोना फक्त मंदिरातच होतो का? हा फक्त भावनेचा प्रश्न नाही तर मंदिरांवर अवलंबून असलेल्या व्यावसायिकांच्या रोजी-रोटीचाही प्रश्न आहे असंही बाळा नांदगावकर यांनी म्हटलं आहे. 
 
मनसे बाळा नांदगावकर यांनी ट्विट करुन ठाकरे सरकारवर मंदिरं उघडण्याच्या मुद्द्यावरुन टीका केली आहे. बारची वेळ ठरवून दिली गेली आहे, जलतरण तलाव खुले केले आहेत. मल्टिप्लेक्सलाही संमती देण्यात आली आहे. मग करोना फक्त मंदिरात असतो का? या मागे या सरकारचा काय तर्क असावा हे एक कोडंच आहे असंही बाळा नांदगावकर यांनी म्हटलं आहे.