सोमवार, 6 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 13 फेब्रुवारी 2019 (09:43 IST)

राज्यसेवा पूर्व परीक्षा परीक्षा केंद्रांच्या परिसरात १४४ कलम

बीड जिल्ह्यात राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१९ नूसार केंद्रावर १७ फेब्रुवारी २०१९ रोजी एकूण ५ हजार ८५६ उमेदवारांची परीक्षा देणार आहेत. त्यानूसार २० उपकेंद्रावर परीक्षा सुरळीतपणे पार पाडण्यासाठी परीक्षा केंद्रांच्या परिसरात १४४ कलम जारी केले आहे. यामध्ये २० उपकेंद्राच्या परिसरात शांतता, सुव्यवस्था रहावी सोबतच अनाधिकृत कृत्ये होऊ नयेत या करीता बीडचे उपविभागीय दंडाधिकारी प्रभोदय मुळे यांनी फौजदारी प्रक्रिया संहितेचे १९७३ चे कलम १४४ मधील शक्तीचा वापर केला आहे. तर तसे  आदेशीत देखील  केले आहे. त्यानुसार परीक्षेच्या दिवशी केंद्र परिसरात परीक्षा सुरु होण्याच्या एक तास अगोदरपासून व परीक्षा संपेपर्यंत पेपर संपेपर्यंत १०० मीटर अंतरापर्यंत शासकीय कर्तव्य पार पाडणाऱ्या अधिकारी-कर्मचारी, परिक्षार्थी यांच्या व्यतिरीक्त दोन किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येण्यास प्रतिबंध करण्यात येत आहे. त्यामुळे ही परीक्षा काटेकोर आणि शिस्तीत होणार आहे, जर याचा कोणी भंग केला तर त्याला तुरुंगात जावे लागणार आहे.