शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 16 नोव्हेंबर 2019 (10:16 IST)

१७ तारखेला अवघड आहे, अजून भरपूर वेळ लागेल : शरद पवार

राज्यात येत्या १७ नोव्हेंबरला सरकार स्थापन होईल अशी चर्चा राजकीय वर्तुळात होती. मात्र १७ नोव्हेंबरला सरकार स्थापन होणं अवघड आहे. असरकार स्थापनेसाठी वेळ लागेल असं वक्तव्य राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे.काँग्रेसचे कार्यकारी प्रदेशाध्यक्ष डॉ. नितीन राऊत यांच्या घरी सदिच्छा भेटीदरम्यान चर्चेदरम्यान शरद पवार यांनी हे वक्तव्य केलं. विदर्भाचा दौरा करुन शरद पवार यांनी शेतकऱ्यांची विचारपूस केली. 
 
१७ नोव्हेंबरला बाळासाहेब ठाकरे यांची पुण्यतिथी असते. त्याच दिवशी शिवसेनेचा मुख्यमंत्री शपथ घेईल असे संकेत दिले जात होते. मात्र शरद पवार यांनी ही शक्यता नाकारली आहे. नितीन राऊत यांच्या घरी ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत भाऊ लोखंडे हे उपस्थित होते. यावेळी १७ नोव्हेंबरला महाराष्ट्राचा इतिहास बदलून द्या, अशी इच्छा लोखंडे यांनी शरद पवारांकडे बोलून दाखवली.