बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: नाशिक , शुक्रवार, 18 ऑगस्ट 2017 (13:28 IST)

सात हजार रिक्त पदे आरोग्य विभागातील भरण्याची प्रक्रिया पूर्ण - डॉ. दिपक सावंत

राज्याची सार्वजनिक आरोग्य विभागातील सात हजार रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया पूर्ण होत असून 22 ऑगस्टनंतर या पदावरील शंभर टक्के नियुक्त्यांमुळे आरोग्य विभागाला नवसंजिवनी मिळेल, असे  प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्री डॉ. दिपक सावंत यांनी काढले.

सटाणा येथील ग्रामीण रुग्णालयातील आधुनिक ट्रामा केअर सेंटरचे उद्घाटन डॉ.सावंत यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी आमदार दिपीका चव्हाण, जिल्हा परिषदेचे आरोग्य व शिक्षण सभापती यतिंन्द्र पाटील, नगराध्यक्ष सनिल मोरे, आरोग्य उपसंचालक लोचना घोडके, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. सुरेश जगदाळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुशील वाकचौरे आदी उपस्थित होते.

डॉ. सावंत म्हणाले, चांगल्या आरोग्य सुविधा देण्याचा शासनाचा प्रयत्न असून या विभागातील वर्ग 3 व 4 शंभर टक्के पदे भरण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिली आहे. वैद्यकिय अधिकाऱ्यांची पदे भरण्याचे अधिकार जिल्हाधिकारी स्तरावर देण्यात आले आहेत. याचबरोबर 781 बीएएमएस वैद्यकिय अधिकाऱ्यांना सेवेत सामावून घेण्याचा निर्णय घेण्यात येत आहे, असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.