गुरूवार, 2 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 23 डिसेंबर 2023 (08:18 IST)

शनिशिंगणापूर देवस्थानच्या कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा इशारा

strike
शनिशिंगणापूर मधील शनि देवस्थानमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी प्रशासनाला आपल्या मागण्यांबाबत एक पत्र दिले असून मागण्या मान्य  न झाल्यास येत्या 25 डिसेंबर पासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. शनिशिंगणापूर देवस्थान मधील कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी यापू्र्वी 12 सप्टेंबर आणि 5 डिसेंबरला देवस्थान प्रशासनाबरोबर झालेल्या बैठकीत समस्यांबाबत तोडगा काढण्याची विनंती केली होती. मात्र अद्यापही देवस्थान प्रशासनाने तोडगा न काढल्याने अखेर कर्मचाऱ्यांनी आता बेमुदत संपाचा इशारा दिला आहे.
 
कर्मचाऱ्यांनी पत्राद्वारे काही मागण्या केल्या आहेत. त्यानुसार, देवस्थानातील कामगार कर्मचारी यांना दिवाळी पुर्वी दरवर्षी 2महिन्याचा पगार बोनस किंवा सानुग्रह अनुदान बोनस म्हणुन देण्यात यावे आणि कोरोना काळातील 18 महिन्याचा राहिलेला अर्धा पगार अदा करण्यात यावा. देवस्थानात अनुकंपा तत्वावर वारसास सेवेत समाविष्ट करण्यात यावे.वैदयकिय सेवा मोफत मिळावी. सेवा निवृत्तीचा कालावधी 58 वरून 60 वय वर्षे करण्यात यावा, यासह काही अन्य मागण्या करण्यात आल्या आहेत.
 
भाविकांची गैरसोय होण्याची शक्यता
नाताळाची सुट्टी आणि नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर शनिशिंगणापूर येथे भाविकांची मोठी गर्दी असते. त्यामुळे शनिशिंगणापूर देवस्थान मधील कर्मचारी संपावर गेले तर या ठिकाणी येणाऱ्या भाविकांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.


Edited by -Ratnadeep Ranshoor