राष्ट्रपती निवडणूक : शिवसेनेचा रामनाथ कोविंद यांना पाठिंबा
राष्ट्रपतीपदासाठी शिवसेनेने रामनाथ कोविंद यांना पाठिंबा जाहीर केला आहे. रामनाथ कोविंद हे भाजप प्रणित एनडीएकडून राष्ट्रपतीपदाचे उमेदवार आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या दिग्गज नेत्यांची ‘मातोश्री’वर बैठक घेऊन यासंदर्भात चर्चा केली आणि त्यानंतर रामनाथ कोविंद यांना पाठिंबा जाहीर केला.
रामनाथ कोविंद हे बिहारचे विद्यामान राज्यपाल आहेत. रामनाथ कोविंद यांच्या नावाला शिवसेना पाठिंबा देणार की नाही, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं होतं. अखेर कोविंद यांच्या नावाला पाठिंबा देऊन शिवसेनेने या चर्चेला पूर्णविराम दिला आहे.