दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटील यांचे वडील शिवाजीराव पाटील यांचे निधन
धुळ्याचे माजी खासदार शिवाजीराव पाटील आणि दिवंगत प्रसिद्ध उत्तम अभिनेत्री स्मिता पाटील यांचे वडील यांचे मुंबईत निधन झाले आहे.शिवाजीराव हे 92 वर्षांचे होते. पाटील यांनी महाराष्ट्र सरकारमध्ये मंत्री, आमदार तर खासदार सुद्धा होते. पाटील यांना त्यांच्या योग्य कामानिमित २०१३ साली पद्मभूषण पुरस्कार देवून गौरवले होते. शिवाजीराव पाटील यांनी त्यांच्या तरुणपणात स्वातंत्र्य लढ्यात सहभाग घेतला होता. सामाजिक कार्य करत त्यांनी राजकारणात प्रवेश केला आही लोकांची सेवा केली आहे. त्यांना अनेक सामजिक पुरस्कार सुद्धा मिळाले आहेत.