मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 26 जून 2018 (08:46 IST)

मुंबई ते बंगळुरु रस्त्यावर शिवशाही धावणार

एसटी महामंडळाच्या वातानुकूलित शिवशाही बस सेवेची आता मुंबई सेंट्रल ते बंगळुरु अशी सेवा २७ जून अर्थात उद्यापासून सुरू होणार आहे. मुंबई ते बंगळुरु सेवेसाठी १९०५ रुपये इतके भाडे आकारण्यात येणार आहे. या गाडीचे वेळापत्रक सकाळी ९.३० ते दुपारी ४.०० असे असणार आहे. तर मुंबई ते हुबळीचे भाडे ११३५ रुपये, मुंबई ते बेळगाव ९५५ रुपये, मुंबई ते कोल्हापूर ७५० रुपये, मुंबई ते कराड ६२० रुपये, मुंबई ते सातारा ५१० रुपये भाडे आहे. शिवशाही बस ही कमी तिकिटात वातानुकूलित आरामदायी प्रवास घडविण्यासाठी तसेच खाजगी लक्झरी बसेसना टक्कर देण्यासाठी सुरू करण्यात आली असून तिला चांगला प्रतिसाद मिळत आहे.