सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated :नांदेड , सोमवार, 3 ऑक्टोबर 2022 (22:08 IST)

प्रताप पाटील चिखलीकरांना धमकी

pratap rao chikhlikar
नांदेडचे भाजप खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार 10 कोटीची खंडणी द्यावी अन्यथा जीवे मारण्यात येईल, अशी धमकी पत्राद्वारे देण्यात आल्याची माहिती  दिलीय. कुख्यात गँगस्टर रिंदा उर्फ हरविंदरसिंघ संधू याच्या नावे हे पत्र घरी आले. दिल्लीत कितीही सुरक्षा असली तरी तुम्हाला मारू असंही या पत्रात म्हटलंय. औरंगाबाद येथे चिखलीकर थोडक्यात बचावले असा उल्लेखही या पत्रात आहे.
 
हे पत्र मिळताच त्याची कल्पना पोलीस अधीक्षकांना दिली. मात्र, त्यांना माहिती देऊनही नांदेड जिल्ह्याबाहेर सुरक्षा पुरवण्यासाठी पोलीसांनी काहीच केले नाही असा आरोप चिखलीकरानी केला.  प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांच्या हत्येने नांदेड हादरले होते. बियाणी यांच्या हत्येला 15 दिवस झाले अजून बियाणी यांच्या हत्येचा तपास लागला नाही. नांदेडच्या पोलिसांवर माझा विश्वास नाही असा आरोप खासदार प्रताप पाटील चिखलीकर हे सातत्याने करीत आहेत. बियाणी यांच्या हत्येचा तपास सीबीआय कडे देण्याची मागणी खासदार चिखलीकर यांनी केली आहे.
 
जुलै महिन्यात हे पत्र आल्यानंतर आतापर्यंत पोलिसांनी सुरक्षा पुरवली नाही. त्यामुळे वाट पाहून अखेरीस या गोष्टीला वाचा फोडत असल्याचं नांदेडचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी सांगितलं.