1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 8 फेब्रुवारी 2021 (09:03 IST)

धक्कादायक बातमी, स्वेटरची दोरी अडकल्यामुळे ९ वर्षांच्या चिमुरड्याचा मृत्यू

Shocking news
सोलापुरमध्ये स्वेटरची दोरी अडकल्यामुळे ९ वर्षांच्या चिमुरड्याचा गळफास लागून  मृत्यू झाला आहे. सोहम शेंडे असे मुलाचे नाव आहे.  सोलापुरातल्या सांगोला तालुक्यात अचकदाणी गावात राहायचा. सोहमचे आई वडील मोलमजुरीसाठी गावात गेले होते. सोहम आजीबरोबर घरात होता. थंडी होती म्हणून सोहमनं स्वेटर घातला होता. 
 
पलंगाशेजारच्या खुंटीशी सोहम खेळत होता. खेळता खेळता खुंटीमध्ये स्वेटरची दोरी अडकली आणि सोहमला गळफास लागला. त्यातच चिमुरड्या सोहमचा मृत्यू झाला.सोहमचा मित्र त्याला बोलवायला आला, त्यावेळी हा धक्कादायक प्रकार उघड झाला.