शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : सोमवार, 3 ऑक्टोबर 2022 (14:45 IST)

भयंकर, मुलाने आपल्या जन्मदात्या आईची हत्या करुन आत्महत्या

murder
नागपुरात एका मुलाने आपल्या जन्मदात्या आईची हत्या करुन आत्महत्या केली आहे. श्रीनिवास चोपडे (वय 51) असं आरोपी मुलाचं नाव असून लीला चोपडे (वय 75) असे हत्या झालेल्या आईचे नाव आहेत. श्रीनिवास आणि त्याची आई धंतोली पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या हिंदुस्थान कॉलोनीमधील प्रशस्त बंगल्यात राहत होते. गेले तीन ते चार दिवस दोघांकडून नातेवाईकांच्या फोनला कोणतेही प्रतिसाद मिळत नसल्यामुळे नातेवाईकांना शंका आली. 
 
एका नातेवाईकाने  हिंदुस्तान कॉलोनीमधील बंगल्यावर येऊन पाहणी केल्यावर बंगला चारही बाजूने बंद आढळला. त्यानंतर त्याने तात्काळ पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांच्या मदतीने घराचे दार तोडून आत प्रवेश केल्यावर लीला चोपडे यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळला. त्यांच्या पोटावर चाकूने वार केल्याचा आणि मृतदेहाशेजारीच हल्ल्यासाठी वापरलेला चाकू आढळून आला. तर काही अंतरावर मुलगा श्रीनिवास याचा मृतदेह आढळला. त्याने विष प्राशन करुन आत्महत्या केली होती. श्रीनिवास इंजिनिअर असून त्याने लग्न केलं नव्हतं. गेली 20 वर्षे तो नोकरी सुद्धा करत नसल्याची माहीत नातेवाईाकांनी दिली. वडिलोपार्जित बंगल्यात तो आईसह राहत होता. वडिलांच्या निवृत्ती मिळणाऱ्या पेन्शनवर दोघांचं जीवन सुरु होतं. श्रीनिवास याने असं आत्मघातकी पाऊल का उचललं याचं नेमकं कारण स्पष्ट झालेलं नाही.